Radhakrishna Vikhe Patil : नगर : पदवी शिक्षणाबरोबरच (Graduate Education) कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षण संस्थाचालकांना स्वीकारावी लागेल. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने (Pravara Rural Education Institute) कौशल्य शिक्षणाकरिता ३७ कोर्सेस सुरू करून तयार केलेला प्रवरा पॅटर्न इतर संस्थांनी स्वीकारावा, असे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले. महसूल विभागातर्फे (Department of Revenue) शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्यात आलेल्या आपले सेवा केंद्राचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ. अनिल राठी, उद्योजक साहेबराव नवले, प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे आदी उपस्थित हाेते.
नक्की वाचा: मराठ्यांचं वादळ साेमवारी नगरमध्ये धडकणार; महाशांतता रॅलीची जय्यत तयारी, असे असेल नियोजन
मंत्री विखे पाटील म्हणाले,
”विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले शासकीय दाखले महाविद्यालयातच उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने जिल्ह्यातील काही शिक्षण संस्थामध्ये आपले सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. राज्यातील पहिला प्रयोग नगरमधून सुरू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
अवश्य वाचा : मराठी सिनेसृष्टीवर शोककळा;ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन
शासनाच्या योजनेशी विद्यार्थ्यांना जोडून घेण्याचा प्रयत्न (Radhakrishna Vikhe Patil)
संगमनेर विभागाचे प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्या पुढाकारने याच महाविद्यालयात ‘युवा ही दुवा’ ही संकल्पना राबवून शासनाच्या योजनेशी विद्यार्थ्यांना जोडून घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. आता आपले सेवा केंद्र महाविद्यालयात सुरू झाल्याने दाखल्याकरिता विद्यार्थ्यांना बाहेर जावे लागणार नाही. शासकीय दरानेच विद्यार्थ्यांना दाखले मिळू शकतील. दाखल्याकरिता होणारी अर्थिक लूट थांबेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला, या माध्यमातून प्रशिक्षण आणि रोजगारच्या संधी निर्माण करून दिल्या जाणार आहेत. मुलीकरिता व्यावसायिक शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने कौशल्य प्रशिक्षणाकरिता ३७ कोर्सेस सुरू केले असल्याचे युवकांना या माध्यमातून कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेता येणार आहे. संस्थेतर्फे प्रशिक्षण भत्ताही देण्यात येत आहे. देशात कौशल्य विकासाचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून शिक्षण संस्थाना आता यापासून दूर जाता येणार नाही. संगमनेर महाविद्यालयाची परंपरा खूप मोठी असून शैक्षणिक गुणवता राखण्यात महाविद्यायाने मिळवलेला नावलौकिक पाहाता प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या धर्तीवर शिक्षण प्रसारक संस्थेने कौशल्य विकास प्रशिक्षणाला प्राधान्य द्यावे, असेही मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.