Radhakrishna Vikhe Patil : नगर : युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ (CM Youth Work Training Scheme) सुरू केली आहे. जिल्ह्यातील दहा हजार युवकांना या योजनेंतर्गत प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध उद्योग व खासगी आस्थापनांनी शासनाच्या या उपक्रमात सहभागी होत जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रशिक्षणाची संधी (Training opportunity) उपलब्ध करुन द्या, असे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.
नक्की वाचा: ओबीसींच्या न्याय हक्क व अधिकारासाठी लढणार : प्रा. लक्ष्मण हाके
आस्थापनांच्या प्रतिनिधीसमवेत बैठकीचे आयोजन
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अनुषंगाने विविध उद्योग, आस्थापनांच्या प्रतिनिधीसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, कौशल्य विभागाचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा: रामगिरी महाराजांचे आक्षेपार्ह वक्तव्य; मुस्लिम समाज आक्रमक
मंत्री विखे पाटील म्हणाले, (Radhakrishna Vikhe Patil)
”शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून रोजगार इच्छुक युवक आणि रोजगार उपलब्ध करुन देणारे उद्योजक जोडले जाणार आहेत. विविध उद्योगातून कौल्यावर आधारित प्रशिक्षण घेतल्यानंतर या युवकांमध्ये नोकरी मिळविण्याची क्षमता अधिक प्रमाणात वृद्धिंगत होणार आहे. या योजनेंतर्गत प्रशिक्षणादरम्यान १२ वी पास असणाऱ्या युवकांना ६ हजार रुपये, आयटीआय अथवा पदविका धारकांना ८ हजार रुपये तर पदवीधर, पदव्युत्तर युवकांना १० हजार रुपये प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर दरमहा शासनाकडुन डीबीटीद्वारे थेट युवकांच्या बँक खात्यामध्ये सहा महिन्यांसाठी विद्यावेतन देण्यात येणार आहे. अधिकाधिक उद्योगांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा. उद्योगांच्या मागणीनुसार विभागाने इच्छुक युवक त्यांना उपलब्ध करुन द्यावेत. जिल्ह्यातील सर्व आयटीआय व महाविद्यालयात युवकांसाठी नोंदणी शिबिराचे आयोजन करत या योजनेची अधिक व्यापक स्वरुपात प्रचार प्रसिद्धी करण्याचे निर्देशही मंत्री विखे पाटील यांनी दिले.