Radhakrishna Vikhe Patil : नगर : महायुती सरकार (Mahayuti Sarkar) घोषणा करणारे नव्हे, तर अंमलबजावणी करणारे आहे. आम्ही जनतेसाठी काम करतो. पण ज्यांना काहीच करता आले नाही, ते फक्त विरोध करतात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) विरोध करणाऱ्या सावत्र भावांना वेळीच ओळखण्याचा सल्ला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिला.
नक्की वाचा: लाडक्या बहिणींना पुढच्या पाच वर्षात ९० हजार रूपये देणार,अजित पवारांचा लाडक्या बहिणीला शब्द
यांची उपस्थिती
शहरातील सहकार भवन येथे मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिणी योजनेच्या राज्यस्तरीय प्रारंभ कार्यक्रमाच्या सहप्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे आदी उपस्थित हाेते.
अवश्य वाचा: वैद्यकीय सेवा आज राहणार बंद; डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा
मंत्री विखे पाटील म्हणाले, (Radhakrishna Vikhe Patil)
”पुणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय प्रारंभ झाला. ऐतिहासिक अशा कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याची संधी मिळाल्याची भावना व्यक्त करत महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनामार्फत महिला केंद्रित योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. एसटी भाड्यामध्ये शासनाने महिलांना ५० टक्के सवलत दिली आहे. तसेच राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. शासन महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
‘लाडकी बहीण’ याेजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पाेहाेचवणार
विद्यमान सरकार हे जनतेच्या मनातील सरकार असून समाजातील सर्व घटकांच्या विकासाबरोबरच महिलांच्या सक्षमीकरणाला शासनाचे प्राधान्य आहे. शासन महिलांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिला लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्यात येणार आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.