Radhakrishna Vikhe Patil : शेतीमध्ये वाढवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : शेतीमध्ये वाढवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil : नगर : सध्या नवीन कृषी तंत्रज्ञान (Agricultural Technology) विकसित होत आहे. कृषी (Agriculture) क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी तरुणांनी नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.

Radhakrishna Vikhe Patil

नक्की वाचा: आसाम सरकारचा मोठा निर्णय; नमाज पठणासाठी आमदारांना दर शुक्रवारी मिळणारी सुट्टी बंद

यावेळी उपस्थित (Radhakrishna Vikhe Patil)

प्रवरा कृषी शास्त्र संस्था (लोणी), कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर (पायरेन्स) आणि शासनाच्या कृषी विभागातर्फे लोणी येथे आयोजित शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाप्रसंगी ते बोलत  होते. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या १२४ व्या जयंती व शेतकरी दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आदी उपस्थित हाेते. 

Radhakrishna Vikhe Patil

जैविक तंत्रज्ञानाच्या आधारावर पिकविलेला भाजीपाला भाविकांना उपलब्ध करून देण्यासाठी शिर्डीत कृषी मालाचे विक्री केंद्र सुरू करता येईल. त्यासाठी जागाही उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली. ते म्हणाले की, ”शेतीत जैविक खतांचा वापर वाढत आहे‌. शेतकरी जागृत झाला आहे. शेतात महिलांचा सहभाग वाढला आहे. अशा परिस्थितीत नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कृषी महाविद्यालय व कृषी संशोधन केंद्र शेतकऱ्यांसाठी आदर्श असले पाहिजे. कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचे काम या संस्थांनी करावे.

Radhakrishna Vikhe Patil

 अवश्य वाचा: पतीचा खून करणारी वकील पत्नी प्रियकरासह गजाआड

कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रात वापर (Radhakrishna Vikhe Patil)

शेती उत्पादनाबरोबर कृषी पणन बळकट झाले पाहिजे. कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी आणि समूह शेतीचा प्रयोग झाला पाहिजे. शेतकरी प्रयोगशील आहे. त्याला संधी उपलब्ध करून द्यायला हवी. मागील काही वर्षांत भारत सरकारने शेती क्षेत्रात १ लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. शेती आता पारंपरिक राहिली नसून शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आले आहे. फवारणीसाठी ड्रोनचा वापर होत आहे‌. कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रात वापर होत आहे. दूधाचे उत्पादन दिवसेंदिवस वाढत जाणार आहे.

Radhakrishna Vikhe Patil

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाकडे कल वाढतो आहे. हे पाहता राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याची गरज आहे. शिवार फेरी, कृषी प्रदर्शनसारख्या उपक्रमातून कृषी संशोधनास चालना मिळणार आहे, असेही पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी विषयक उपक्रम व योजनांची माहिती देणाऱ्या घडी पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. बँकाँक येथे जाऊन बदलत्या कृषी तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण घेतलेल्या ३० विद्यार्थ्यांचा यावेळी प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. राहुरी कृषी विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त तन्मय शिंपी व फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद प्राप्त करणाऱ्या प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या संघाचा यावेळी सत्कार करण्यात आला.