Radhakrishna Vikhe Patil : नगर : श्रीक्षेत्र नेवासे येथे उभारण्यात येणाऱ्या संत ज्ञानेश्वर सृष्टीचा (Sant Dnyaneshwar Srishti) प्रकल्प आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे (Punyashloka Ahilya Devi) स्मारक जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी (Tourists) महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ज्ञानेश्वर सृष्टीच्या प्रकल्पाचा आराखडा तातडीने तयार करावा, याचे सादरीकरण लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासमोर करण्यात येणार आहे. अहिल्यादेवी स्मारकाच्या जागेबाबत प्रस्ताव त्वरित सादर करण्याच्या सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिल्या.
नक्की वाचा: ‘जरांगेंना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही तर मीडियामध्ये राहायचं’-परिणय फुके
जिल्हाधिकारी कार्यालयात संत ज्ञानेश्वर सृष्टी विकास आराखडा आणि अहिल्यादेवी स्मारकाबाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी ज्ञानेश्वर सृष्टीच्या तयार करण्यात आलेल्या आरखड्याची माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज!महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार
‘अहिल्यादेवी’ स्मारक देशातील स्मारकांपैकी एक असणार
मंत्री विखे पाटील म्हणाले, ”संत ज्ञानेश्वर सृष्टीचे काम पर्यावरण बदलात टिकणारे आणि भूकंपरोधक असावे. या सृष्टीच्या भव्यतेसोबत भेट देणाऱ्या अध्यात्मिक वातावरणाचा अनुभव येईल अशी रचना असावी. मुख्यमंत्र्यांकडे या विकास आराखड्याचे सादरीकरण लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नेवासेचे स्थान महात्म्य देशभरात पोहोचविणारे स्मारक असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करतानाच निर्माण होणारे स्मारक राज्यातील वारकरी सांप्रदयाच्या दृष्टीने तसेच जिल्ह्यात येणारे भाविक पर्यटक यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे असावे अशी अपेक्षा व्यक्त केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक देशातील उत्तम स्मरकांपैकी एक असेल, असा आराखडा तयार करावा. स्मारकाच्या ठिकाणी महिला सक्षमीकरण केंद्र असावे.”
नगर-शिर्डी रस्त्याच्या कामाचा आढावा (Radhakrishna Vikhe Patil)
पालकमंत्री विखे पाटील यांनी नगर-शिर्डी रस्त्याच्या कामाचाही आढावा घेतला. रस्त्याची कामे करताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ट्रॅफिक वॉर्डन नेमावे. अजूनही खड्डे दुरुस्तीचे काम झालेले नाही, ते त्वरित करावे, असे निर्देश त्यांनी दिले.