Radhakrishna Vikhe Patil : नगर : हरियाणा राज्यात भारतीय जनता पक्षाला (BJP) मिळालेला विजय आत्मविश्वास वाढविणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशातील जनता विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहात असल्याचा संदेश, या निकालाने दिला असल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केली.
नक्की वाचा: ‘माझी राजकीय भूमिका पवार साहेबांच्या संमतीनेच’-अजित पवार
हरियाणात सलग तिसऱ्यांदा भाजप विजयी
हरियाणा राज्यात सलग तिसऱ्यांदा भाजप पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री जे. पी नड्डा आणि हरियाणामधील सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
अवश्य वाचा: राज्यात आजपासून पुन्हा पावसाची शक्यता,हवामान विभागाचा अंदाज
मंत्री विखे पाटील म्हणाले, (Radhakrishna Vikhe Patil)
”लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्हचा उपयोग करून विरोधकांनी निर्माण केलेल्या वातावरणाला हरियाणाच्या निकालाने चपराक दिली आहे. देशातील जनता खोट्या प्रचाराच्या नव्हे, तर विकासाच्या मागे उभी राहाते, या विजयाने दाखवून दिले आहे. हरियाणामध्ये निवडणुकीच्या आधी अग्निवीर योजनेच्या विरोधात जाणीवपूर्वक वातावरण निर्माण केले गेले. खेळाडूंना पुढे करून राजकारण करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. यासर्व घटनांना हरीयाणातील जनतेन मतदानातून नाकारले आणि भाजप पक्षाच्या विकासाच्या राजकारणाला पाठबळ दिले असल्याकडे मंत्री विखे पाटील यांनी लक्ष वेधले.”