Radhakrishna Vikhe Patil : लोकाभिमुख योजना राबविण्यासाठी शासन कटिबद्ध – राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil

0
Radhakrishna Vikhe Patil : लोकाभिमुख योजना राबविण्यासाठी शासन कटिबद्ध - राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : राहाता : तरूण, महिला, कामगार, ज्येष्ठ नागरिक (Senior citizen) व वंचित घटकांच्या कल्याणासाठी विविध लोकाभिमुख योजना राबविण्यासाठी राज्य शासन (State Government) कटिबद्ध असल्याची ग्वाही अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली.

Radhakrishna Vikhe Patil : लोकाभिमुख योजना राबविण्यासाठी शासन कटिबद्ध - राधाकृष्ण विखे पाटील

अवश्य वाचा: नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये तोफगोळ्याचा भीषण स्फोट; दोन अग्निवीरांचा मृत्यू

५४ कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

संगमनेर येथे आयोजित नारीशक्ती सन्मान व ५४ कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, उपविभागीय कृषी अधिकारी भाऊसाहेब गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, कृषी अधिकारी गायकवाड आदी उपस्थित होते.

Radhakrishna Vikhe Patil : लोकाभिमुख योजना राबविण्यासाठी शासन कटिबद्ध - राधाकृष्ण विखे पाटील

नक्की वाचा: बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक अत्याचार करणारे तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, (Radhakrishna Vikhe Patil)

शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाकडे पाऊल टाकले आहे. या योजनेतील लाभापासून वंचित महिलांना सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या तीन महिन्यांचे पैसे येत्या काही दिवसांत महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. या योजनेत संगमनेर तालुक्यात १०१ कोटी रुपयांचा लाभाचे वितरण करण्यात आले आहे. पीक विमा, दूध अनुदान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले आहेत.

Radhakrishna Vikhe Patil : लोकाभिमुख योजना राबविण्यासाठी शासन कटिबद्ध - राधाकृष्ण विखे पाटील

शासनाने अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांचे मानधन वाढविले. महिलांना एसटी भाड्यात ५० टक्के सवलत दिल्याने तोट्यातील एसटी फायद्यात आली‌‌‌ आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन भेट योजनेतून येत्या काळात जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या यात्रा घडवून आणली जाणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा योजनेत शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्यात आले आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते जलजीवन जीवन मिशनच्या १५ कोटीच्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. काही महिला बचतगटांना प्रातिनिधिक स्वरूपात फुड प्रोसेसिंग युनिटचे वाटप करण्यात आले. बांधकाम कामगार आवश्यक साधने व उपकरणे वाटप या योजनेतील ४०० लाभार्थांपैकी एका कामगारांला प्रातिनिधिक स्वरूपात साहित्याचे वाटप करण्यात आले. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेतील लाभार्थ्यांना लाभाचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. महिला बचतगटांना प्रातिनिधिक स्वरूपात बँक कर्जाचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here