Radhakrishna Vikhe Patil : कुकडी-घोड प्रकल्पातून चार आवर्तन सोडण्याचा निर्णय : मंत्री विखे 

Radhakrishna Vikhe Patil : कुकडी-घोड प्रकल्पातून चार आवर्तन सोडण्याचा निर्णय : मंत्री विखे 

0
Radhakrishna Vikhe Patil : कुकडी-घोड प्रकल्पातून चार आवर्तन सोडण्याचा निर्णय : मंत्री विखे 
Radhakrishna Vikhe Patil : कुकडी-घोड प्रकल्पातून चार आवर्तन सोडण्याचा निर्णय : मंत्री विखे 

Radhakrishna Vikhe Patil : नगर : कुकडी प्रकल्पातून (Kukadi Project) सध्या सुरू असलेले रब्बी आवर्तन क्र. १ गृहीत धरून एकूण चार तसेच घोड प्रकल्पातून सध्या सुरू असलेले आवर्तन क्र.१ धरून एकूण चार आवर्तन देण्याचा निर्णय राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कुकडी आणि घोड संयुक्त प्रकल्प कालवा सल्लागार समिती (Canal Advisory Committee) बैठकीत घेण्यात आला.

Radhakrishna Vikhe Patil : कुकडी-घोड प्रकल्पातून चार आवर्तन सोडण्याचा निर्णय : मंत्री विखे 
Radhakrishna Vikhe Patil : कुकडी-घोड प्रकल्पातून चार आवर्तन सोडण्याचा निर्णय : मंत्री विखे 

नक्की वाचा : भारतात आढळला एचएमपीव्ही व्हायरसचा पहिला रुग्ण

अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या या बैठकीस आमदार काशिनाथ दाते, विक्रम पाचपुते (दूरदृश्य प्रणालीद्वारे) , ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, शरद सोनवणे, नारायण आबा पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, कृष्णा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे), समितीची सदस्य आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरणी तिन्ही आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी  

मंत्री विखे पाटील म्हणाले, (Radhakrishna Vikhe Patil)

शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळेल असे सूक्ष्म नियोजन पाटबंधारे विभागाने करावे. पीक पाहणी नुसार  नियोजन करावे. प्रत्यक्षात पिकांचा प्रकार आणि गरज लक्षात घेऊन पाणी द्यावे. पाण्याचे आवर्तन सोडताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात असे ही मंत्री म्हणाले. कुकडी संयुक्त प्रकल्पात येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे व डिंभे मिळून एकूण १९.४३६ टी.एम.सी. पाणीसाठा उपलब्ध आहे. कुकडी डावा कालव्याद्वारे दुसऱ्या आवर्तनासाठी  २० फेब्रुवारीपासून पाणी सोडण्याचे  बैठकीत ठरले. तसेच कुकडी प्रकल्पाचे आगामी  आवर्तन पूर्ण झाल्यानंतर शिल्लक राहिलेला पाणीसाठा, तसेच पुढील पावसाळ्यापूर्वीची टंचाईची परिस्थिती पाहून उन्हाळी आवर्तनाबाबत  स्वतंत्र निर्णय घेण्यात येईल, असे  विखे पाटील यांनी सांगितले.घोड प्रकल्पात २.४६ टी.एम.सी. पाणीसाठा उपलब्ध आहे. प्रकल्पाचे दुसरे आवर्तन २० फेब्रुवारीपासून  सोडण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले. श्रीगोंदा आणि शिरूरच्या लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून नियोजन करावे अशी सूचना त्यांनी केल्या.