Radhakrishna Vikhe Patil : नगर : भंडारदारा (Bhandardara) प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून उन्हाळ्याचे तीन आणि रब्बीचे एक आवर्तन करण्यावर जलसंपदा मंत्री (Water Resources Minister) (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. निळवंडे कालव्यांना १५ जानेवारी पासून पाणी देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
नक्की वाचा : रस्ते अपघातातील जखमींना मिळणार कॅशलेस उपचार,नितीन गडकरींची घोषणा
भंडारदारा प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक
भंडारदारा प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक लोणी येथील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहात पार पडली. याप्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार डॉ. किरण लहामटे आमदार अमोल खताळ, आमदार हेमंत ओगले, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, नाशिक विभाग मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, स्वप्निल काळे, निळवंडे प्रकल्पाचे अभियंता बाळासाहेब शेटे, कैलास ठाकरे आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : अहिल्यानगरमध्ये तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन
१५ जानेवारी पासून आवर्तन सोडणार (Radhakrishna Vikhe Patil)
भंडारदरा प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाण्यातून सध्या सिंचन बिगर सिंचनाचे आवर्तन सुरू आहे. येणाऱ्या काळात २० फेब्रुवारी ते २४ मार्चमध्ये पुढचे आवर्तन करण्याचे नियोजन असून, २४ मार्च ते ३० एप्रिल मध्ये दुसरे आवर्तन आणि शिल्लक पाण्यातून जूनमध्ये एक आवर्तना बाबत नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. निळवंडे प्रकल्पात सहा टीएमसी पाणी साठा उपलब्ध असून कालव्यांना १५ जानेवारी पासून आवर्तन सोडण्यात येणार आहेत.