Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांनी कृषीक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल स्वीकारावेत – राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil

0
Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांनी कृषीक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल स्वीकारावेत - राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांनी कृषीक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल स्वीकारावेत - राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : राहाता : आधुनिक तंत्रज्ञान व जैविक खतांचा वापर करून शेतीची उत्‍पादन क्षमता वाढवावी लागणार असून शेतकऱ्यांना कृषीक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल आता स्वीकारावे लागणार आहेत, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.

नक्की वाचा : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून ५ लाख महिला अपात्र

डाळींब उत्‍पादक शेतकरी उपस्थित

डाळिंबरत्‍न बाबासाहेब गोरे यांच्‍या पुढाकाराने अहिल्‍यानगर, पुणे, नाशिक जिल्‍ह्यातील डाळिंब उत्‍पादक शेतकऱ्यांसाठी राहाता तालुक्यातील राजुरी येथे आयोजित केलेल्‍या ‘डाळिंब बहार मेळावा’ व ‘कृ‍षी प्रदर्शनाचे’ उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी महंत उद्धव महाराज मंडलिक, जिल्‍हा अधीक्षक कृषी आधिकारी सुधाकर बोराळे, बाजार समितीचे उपसभापती आण्‍णासाहेब कडू, महाराष्‍ट्र पशू व मत्‍स्य विद्यापीठाचे सदस्‍य ऋषिकेश खांदे, तालुका कृषी आधिकारी आबासाहेब भोरे, सतीश बावके, संदीप निर्मळ, सचिन चिंधे, हर्षल खांदे यांच्‍यासह डाळींब उत्‍पादक शेतकरी उपस्थित होते.

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांनी कृषीक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल स्वीकारावेत - राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांनी कृषीक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल स्वीकारावेत – राधाकृष्ण विखे पाटील

अवश्य वाचा : शेवगाव येथील मंदिर सेवेकऱ्याच्या हत्येची उकल

पालकमंत्री विखे पाटील म्‍हणाले की, (Radhakrishna Vikhe Patil)

कृषी क्षेत्रामध्‍ये नैसर्गिक आणि मानव निर्मित आव्‍हाने निर्माण होत असले तरी, यावर मात करुन, तरुण शेतकरी प्रयोगशील शेतीकडे वळत आहेत. या शेतकऱ्यांना बाबासाहेब गोरे यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरत आहे. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे धोरण उपयुक्त ठरेल. तसेच, निर्यातक्षम उत्पादन वाढवण्यासाठी कृषी संस्थांनी शासनाबरोबर एकत्र येऊन मार्गदर्शन करावे. देशाच्‍या आर्थिक विकासात कृषी क्षेत्राचा वाटा महत्त्वपूर्ण असल्‍याने केंद्र व राज्‍यशासन शेतकऱ्यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांंनी दिली. 

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांनी कृषीक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल स्वीकारावेत - राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांनी कृषीक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल स्वीकारावेत – राधाकृष्ण विखे पाटील

पालकमंत्री विखे पाटील म्‍हणाले, नुकत्‍याच सादर झालेल्‍या अर्थसंकल्‍पातही कृषीक्षेत्रासाठी भरीव तरतुदी करण्‍यात आल्‍या आहेत. केंद्र शासनाने नेहमीच प्रक्रिया उद्योग आणि कृषी क्षेत्रातील स्‍टार्टअपला प्रोत्‍साहन दिले असून कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करतानाच सेंद्रीय शेतीलाही आपल्‍याला पुढे घेवून जावे लागेल. जैविक खतांचा योग्य प्रमाणात वापर केल्यानेच आज उत्पादन क्षमता वाढत आहे.

राज्‍यशासनाने हवामानावर आधारित पीकविमा योजना फळांसाठीदेखील लागू केली असून, याचा मोठा लाभ हा डाळिंब उत्‍पादक शेतकऱ्यांनाही झाला आहे. राज्‍यशासन कोणतीही योजना बंद करणार नाही, लाडक्‍या बहिणींप्रमाणेच शेतकऱ्यांनाही विमा योजनेचा लाभ देण्‍यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी उध्‍दव महाराज मंडलिक, बाबासाहेब गोरे यांचीही भाषणे झाले. यावेळी पालकमंत्र्यांनी प्रदर्शनातील कृषी औजारे व साहित्याच्या स्टॉलना भेट दिली.