Radhakrishna Vikhe Patil : साकळाईच्या फेर जल नियोजनास महायुती सरकारचा हिरवा कंदिल; मंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नाचे मोठे यश!

Radhakrishna Vikhe Patil : साकळाईच्या फेर जल नियोजनास महायुती सरकारचा हिरवा कंदिल; मंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नाचे मोठे यश!

0

Radhakrishna Vikhe Patil : अहील्यानगर : पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरूर तालुयातील मौजे चिंचणी येथील घोड धरणाच्या फेर जल नियोजनास राज्याच्या जलसंपदा विभागाने (Water Resources Department) शुक्रवारी मंजुरी देवून शासन आदेश जारी केल्याने फेर जल नियोजनात प्रस्तावित साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी (Sakalai Irrigation Scheme) आवश्यक पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी राज्यात महायुती सरकार आल्यानंतर घेतलेल्या बैठकांचे यश शासन निर्णयातून स्पष्ट झाले आहे. महायुती सरकारच्या निर्णयाचा मोठा दिलासा साकळाई लाभक्षेत्रातील शेतकर्याना मिळाला आहे.

नक्की वाचा : चालकाच्या रागामुळे चार निष्पापांचा गेला बळी

साकळाई योजनेसाठी मंत्रालय स्तरावर घेतल्या बैठका

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साकळाई योजनेचा शब्द दिला होता. परंतु, त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले व साकळाई योजनेचा प्रश्न मागे पडला. त्यानंतर पुन्हा युतीचे सरकार आल्यानंतर युती सरकारच्या काळात माजी खासदार सुजय विखे पाटील व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साकळाई योजनेसाठी आवश्यक असणारे पाणी उपलब्ध असल्याचे दाखवून दिले होते. त्याचा पाठपुरावा म्हणून साकळाई योजनेसाठी मंत्रालय स्तरावर बैठका घेतल्या होत्या.

Radhakrishna Vikhe Patil : साकळाईच्या फेर जल नियोजनास महायुती सरकारचा हिरवा कंदिल; मंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नाचे मोठे यश!
Radhakrishna Vikhe Patil : साकळाईच्या फेर जल नियोजनास महायुती सरकारचा हिरवा कंदिल; मंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नाचे मोठे यश!

अवश्य वाचा : यंदाच्या वर्षी फक्त पहिलीच्या वर्गालाच सीबीएससी : दादा भुसे

शेतकर्‍यांमधून महायुतीच्या निर्णयाचे स्वागत (Radhakrishna Vikhe Patil)

आता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले योगायोगाने ना. राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा खात्याचे मंत्री झाल्यानंतर. साकळाई योजनेचा प्रश्न सुटणार आशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मंत्री विखे पाटील यांनी साकळाई योजना मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले होते. यासाठी पुन्हा मंत्रालय स्तरावर झालेल्या बैठकामधून अंतिम निर्णय करताना फेर जलनियोजन करण्यावर शिक्कमोर्तब झाल्याने साकळाई योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकर्‍यांमधून महायुतीच्या निर्णयाचे स्वागत करतानाच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील तसेच यासाठी पाठपुरावा करणारे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले.