Radhakrishna Vikhe Patil : स्वतःच करा स्वतःची ई- पीक पाहणी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : स्वतःच करा स्वतःची ई- पीक पाहणी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
Radhakrishna Vikhe Patil : स्वतःच करा स्वतःची ई- पीक पाहणी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil : स्वतःच करा स्वतःची ई- पीक पाहणी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : नगर : खरीप व रब्बी हंगाम अशा दोन्ही हंगामामध्ये शेतकऱ्यांना स्वतः आपल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई- पीक पाहणी (E-Peek Pahani) हा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने (State Govt) सुरु केलेला आहे. यासाठी ई- पीक पाहणीचे स्वतंत्र ॲप (App) तयार करण्यात आलेले आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांनी सुलभतेने स्वतःच्या पिकाची नोंद स्वतः करून स्वत:च ई- पीक पाहणी करावी, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितले.

हे देखील वाचा : कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी प्रशासनाची बैठक

राहता तालुक्यातील रांजणखोल येथे शेतातील पीक पाहणीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात सध्या रब्बी हंगाम सुरु असून रब्बी हंगामाची ई- पीक पाहणी शेतकऱ्यांना करावयाची आहे. त्यासाठी प्ले स्टोअर वरून ई- पीक पाहणीचा नवीन व्हर्जन २ ॲप इन्स्टॉल करावे. ई- पीक पाहणी करताना आपले शेतातील पिकांची फळ झाडांची, विहीर अथवा बोअरवेलची नोंद करता येणार आहे. शासनाच्या पीक विमा व नुकसानीचे अनुदान प्राप्त करण्यासाठी ई- पीक पाहणी असणे आवश्यक आहे. असेही त्यांनी सांगितले.

नक्की वाचा : कालव्‍यांची कामे रखडवून कोणती ‘निर्मिती’ साध्‍य करायची होती : राधाकृष्‍ण विखे पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here