Radhakrishna Vikhe Patil : प्रवरा सहकारी बँक अहील्यानगरच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्राच्या यशस्वी वाटचालीत महत्वपूर्ण भागीदारी करेल : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : प्रवरा सहकारी बँक अहील्यानगरच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्राच्या यशस्वी वाटचालीत महत्वपूर्ण भागीदारी करेल : ना. राधाकृष्ण विखे पाटील

0

Radhakrishna Vikhe Patil : नगर : सहकारी बॅकींग क्षेत्रात प्रवरा सहकारी बँकेने (Pravara Sahakari Bank) प्रगतीचा मोठा टप्पा गाठला आहे. विळदघाट येथे नव्याने सुरू झालेली बँकेची शाखा अहील्यानगरच्या औद्योगिक (Industrial) आणि व्यावसायिक क्षेत्राच्या यशस्वी वाटचालीत महत्वपूर्ण भागीदारी करेल असा विश्वास जलसंपदा तथा पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केला.

नक्की वाचा : पुण्यातील धनकवडीत २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; २० ते २५ वाहनांची तोडफोड

मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन

प्रवरा सहकारी बँकेने विळदघाट येथे सुरू केलेल्या बँकेचे कार्यालयाचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सौ. शालीनी विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमास माजी आमदार नंदकुमार झावरे वसंतराव कापरे बॅकेचे चेअरमन डॉ भास्कराव खर्डे व्हा. चेअरमन मच्छिन्द्र थेटे सीईओ सौरभ बालोटे सर्व संचालकांसह पद्मश्री डॉ. विखे पाटील फाउंडेशनचे डायरेक्टर डॉ. अभिजीत दिवटे डॉ. पांडूरंग पवार यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.

अवश्य वाचा : सुवर्णपदक विजेता देवदत्तने साधला I❤️नगरशी खास संवाद…

कर्जदारांच्या सहकार्याने यशस्वी वाटचाल (Radhakrishna Vikhe Patil)

लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी अतिशय दूरदृष्टीने या बँकेची मुहूर्तमेढ रोवली. समाजातील छोट्या वर्गाला या बॅकेने विविध कर्ज योजनेतून आधार दिला. आज सभासद ठेवीदार आणि चांगल्या कर्जदारांच्या सहकार्याने पन्नास वर्षांची यशस्वी वाटचाल बॅकेने पूर्ण केली असून सुमारे चौदाशे कोटी रुपयांचा व्यावसायिक टप्पा पूर्ण केला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

विळदघाट येथे बॅकेची सुरू होणारी बॅकेची शाखा अहील्यानगर जिल्ह्यातील व्यापारी उद्योजक आणि छोट्या व्यवसायिकांच्या करीता आधार ठरेल. अहील्यानगरच्या व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राला मोठी पंरपंरा लाभली असल्याने भविष्यात या शहराच्या या प्रगतीत प्रवरा बॅके नक्कीच चांगली भागीदारी करेल. नागापूर औद्योगिक वसाहतीला ही शाखा खूप जवळ असल्याने उद्योजकांना दैनंदीन अर्थिक व्यवहारासाठी विश्वासाचे ठिकाण निर्माण झाले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

बँकिंग क्षेत्रात वाढती स्पर्धा पाहाता ग्राहकांच्या सुध्दा काही अपेक्षा जाणून घेण्यासाठी प्रवरा बँकेच्या वतीने ग्राहक तसेच उद्योजकांच्या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले. सर्वाचे स्वागत बॅकेचे चेअरमन डॉ भास्कराव खर्डे यांनी केले.