Radhakrishna Vikhe Patil : नगर : लोकप्रतिनिधी (Public Representative) आणि प्रशासनातील सर्व विभागांच्या आधिका-यांमध्ये चांगला समन्वय राहिल्यामुळेच योजनांच्या अंमलबजावणीत अहिल्यानगर जिल्हा राज्यात अग्रस्थानी राहिला आहे. भविष्यातही जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेचा वेग कायम राहण्यासाठी लोकप्रतिनिधी अन अधिकारी यांच्यात सुसंवाद राहू द्या. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या दिडशे दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले आहे.
नक्की वाचा : श्रीगोंदा तालुक्यातील लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू; कोलकाता येथे होणार अंत्यसंस्कार
नव्याने रुजू झालेल्या-बदलून गेलेल्या आधिका-यांचा सन्मान सोहळा
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नव्याने रुजू झालेले तसेच बदलून गेलेल्या आधिका-यांचा सन्मान सोहळा मंत्री विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या निमित्ताने आयोजित केलेल्या स्नेह संवाद मेळाव्यात त्यांनी जिल्ह्यात विकास प्रक्रीयेची सुरु असलेली वाटचाल तसेच अगामी काळात जिल्ह्याच्या विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कराव्या लागणा-या निर्णयांची माहीती त्यांनी दिली. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, साखर आयुक्त सिध्दराम सालीमठ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरीक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरीक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, आयुक्त यशवंत डांगे, शिर्डी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्यासह सर्व विभागांचे जिल्हा आणि क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.
अवश्य वाचा : अहिल्यानगर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
मंत्री विखे पाटील म्हणाले की, (Radhakrishna Vikhe Patil)
मागील अडीच वर्षात शासनाच्या अनेक सामाजिक उपक्रमांमधून सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रीयेत आणता आले. शासन आपल्या दारी उपक्रमातून सुमारे २५ लाख लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले देता आले. लाडकी बहीण योजनेची सुमारे १३ लाख महिलांनी केलेली नोंदणी, घरकुल योजनेची यशस्वी अंमलबजावणी यांसह अन्य विभागांनीही त्यांच्या स्तरावर केलेल्या यशस्वी कामगिरीमुळे राज्यात अहिल्यानगर जिल्हा अग्रेसर राहीला. यासर्व प्रक्रियेत प्रशासनातील आधिका-यांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यात विकासप्रक्रीया चांगल्या पध्दतीने राबवल्यामुळे महायुतीला जनतेचे पाठबळ दिले. तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी चांगला संवाद ठेवलेणे काम वेगाने पूर्ण होतात. इतरांसारखे आवाज चढवून बोलून काम होत नाही, असे टोलाही त्यांनी लगावला.जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी जिल्ह्यात प्रशासनाकडून सुरु असलेल्या विकास कामांबाबत माहिती दिली. साखर आयुक्त सिध्दराम सालीमठ यांनी मंत्री विखे पाटील यांच्या प्रशासनाशी असलेल्या सुसंवादाचे कौतूक केले. या जिल्ह्यामध्ये विकासाच्या खुप संधी आहेत. विकासाचा विचार करुन, काम करणारे नेतृत्व आहे. माझ्या ३२ वर्षाच्या प्रशासकीय सेवेत अनेक जिल्ह्यात काम केले पण असा अधिकारी वर्गाचा सन्मान प्रथमच अनुभवता आला, असे त्यांनी म्हटले.