Radhakrishna Vikhe Patil : नगर : जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिले. पालकमंत्री कार्यालयात जनता दरबारच्या माध्यमातून पालकमंत्री (Guardian Minister) विखे पाटील यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. प्राप्त झालेल्या अर्जावर सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
नक्की वाचा : किरण काळे प्रकरणाचा सखोल तपास व्हावा; खासदार नीलेश लंके यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी
विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित
यावेळी अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
अवश्य वाचा : सुपा पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी ज्योती गडकरी; दिवटे यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली
अर्जदारास अहवाल सादर करण्याच्या सूचना (Radhakrishna Vikhe Patil)
जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पालकमंत्री कार्यालयात पालकमंत्र्यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन नागरिकाचे अर्ज स्वीकारून त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. अहिल्यानगर महापालिका, भूमी अभिलेख, जलसंपदा, महावितरण, महसूल, जलसंधारण, वनविभाग यासह इतर विभागाच्या संदर्भातील अर्ज जनता दरबारात प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या सर्व अर्जावर गांभीर्याने कार्यवाही करून पालकमंत्री कार्यालयास आणि संबंधित अर्जदारास केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.