Radhakrishna Vikhe Patil : नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वाखाली भारत देश आत्मनिर्भरतेने यशस्वी प्रवास करीत आहे. विश्वामध्ये सर्वाधिक सदस्य असलेल्या कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन पक्षाकडे आहे. आगामी काळात हिंदुत्वाच्या विचाराने कार्यकर्त्यांची ताकदच देशाला बलशाली बनवेल, असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केला. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही (Election) शत प्रतिशत महायुतीच्या (Mahayuti) विजयाचा निर्धार करा, असे आवाहन त्यांनी केले.
नक्की वाचा : भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल
पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या जनसंपर्क कार्यालयात मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष अध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराध्यक्ष अनिल मोहीते, उत्तरचे अध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले की, देशात सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान नरेंद्र मोदीजी यांना मिळाला.
अवश्य वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती
कार्यकर्त्यांचे संघटन हीच पक्षाची ताकद (Radhakrishna Vikhe Patil)
राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीला सत्ता मिळाली. भाजप पक्ष सर्वाधिक जागा जिंकून क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीने नकारात्मक प्रचार करुन, मतदारांची दिशाभूल केली मात्र, विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या संघटीत प्रयत्नांमुळे मोठे यश आपल्याला मिळू शकले. जगात सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष म्हणून भाजपची ओळख आहे. विचारांच्या आधारावर आणि कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन हीच पक्षाची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.