Radhakrishna Vikhe Patil : संगमनेर: आमदार अमोल खताळ (MLA Amol Khatal) यांच्यावर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण तालुका हादरला असून तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांना शांत करताना खताळ यांनी कायदा (Law) हातात न घेण्याचे आवाहन केले. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता.२९) सकाळी महायुतीतर्फे संगमनेरमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चाची सुरुवात आमदार खताळ यांच्या कार्यालयापासून झाली आणि तो प्रांत कार्यालयाच्या आवारात जाऊन संपन्न झाला. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी थोरात यांच्यावर नाव न घेता जोरदार प्रहार केला.
नक्की वाचा : जीएसटीमध्ये लवकरच मोठे बदल;काय होणार स्वस्त तर काय होणार महाग ?
पराभव पचवता न आल्याने अशी कृत्ये
ते म्हणाले, हा प्रकार अतिशय दुर्दैवी असला तरी नवीन नाही. एकीकडे दहशतमुक्त तालुका म्हणायचा आणि दुसरीकडे विरोधकांवर हल्ले करायचे, ही ठोकशाही आहे. लोकशाहीतील पराभव पचवता न आल्याने आज अशी कृत्ये केली जात आहेत. काही दिवसांपूर्वी कीर्तनकारावर हल्ला झाला, आता आमदार खताळ यांच्यावर हल्ला झाला. कितीही हल्ले केले तरी आम्ही त्याच ताकदीने विरोध करू. विकासाचा मार्ग खताळ यांनी खुला केला आहे, दुष्काळमुक्ती घडवून आणली आहे. कालच्या घटनेने लोकांच्या मनातून तुम्ही उतरलेले आहात. ही घटना पूर्वनियोजित असून पोलिसांनी सखोल चौकशी केली पाहिजे. अधिकारी कुचराई करणार असतील तर त्यांच्यावरही कारवाई होईल.
अवश्य वाचा : सोन्याच्या दागिने जास्त चमकवून देतो म्हणत महिलेची फसवणूक; पाच तोळे लांबवीले
दहशतवाद मोडून विकासाचे राजकारण (Radhakrishna Vikhe Patil)
यावेळी विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटले की “धांदरफळला हल्ला झाला, त्यावेळी आमदार बदलला, आता पुन्हा हल्ला झाला आहे. येणाऱ्या निवडणुकांत भगवा शंभर टक्के फडकवायचा आहे. दहशतवाद मोडून काढून विकासाचे राजकारण उभे करायचे आहे.” तसेच भाजप कार्यकर्त्यांना धमक्या देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. तुम्ही कितीही कट-कारस्थान केले तरी तालुक्यातील हिंदुत्वाचा विचार संपणार नाही. कालच्या घटनेने लोकांच्या मनातूनही तुम्ही उतरलेले आहात. पोलिसांनी घटनेचा सखोल तपास करून सूत्रधार बाहेर काढला पाहिजे. अधिकारी कुचराई करणार असतील तर त्यांच्यावरही कारवाई होईल. त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना सांगितले की धांदरफळ येथे हल्ला झाला तेव्हा आमदार बदलला, आता पुन्हा हल्ला झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांत भगवा शंभर टक्के फडकवायचा आहे. आम्ही जशास तसे उत्तर देऊ शकतो.हल्ल्यानंतर कार्यकर्त्यांसमोर बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले, माझ्यावर हल्ला झाला तरी मी एक इंच मागे हटणार नाही. माझ्या मागे जनतेची ताकद उभी आहे. आपल्याला शांततेचा भंग करायचा नाही. विरोधक पराभव स्वीकारायला तयार नाहीत, म्हणून अशा घटना घडवल्या जात आहेत. पण आपण घाबरणार नाही. माझा प्रत्येक श्वास जनतेसाठी आहे. भ्याड हल्ल्याने मी घाबरलो नाही. कार्यकर्त्याला जर हात लावला तर आधी मला सामोरे जावे लागेल. संगमनेरात घडलेल्या या घटनेने राजकीय वातावरण तापले आहे. संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असून, यामागील खरा सूत्रधार कोण आहे हे शोधण्याची मागणी महायुतीने केली आहे.