Radhakrishna Vikhe Patil : नगर : मागील तीन वर्षात दस्तनाेंदणी झालेल्या सर्व दस्तांची तपासणी करण्यात येणार आहे. हा अहवाल नववर्षात राज्य शासनाला (State Govt) प्राप्त हाेणार आहे. त्यानंतर राज्यभरात महारेरा आणि तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करून बेकायदा दस्त नाेंदणी करणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल (Will take action), अशी ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विधानसभेत दिली.
हे देखील वाचा : शनिशिंगणापूर देवस्थानमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार ; शिंदे फडणवीस सरकारची घोषणा
राज्यात सन २०२० ते २०२२ या कालावधीत महारेरा आणि तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करून दस्त नोंदणी केल्याबाबत वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री विखे पाटील त्यावर उत्तर देताना म्हणाले, ”शासनाच्या सूचनेनुसार नोंदणी महानिरीक्षकांनी नोंदणी उपमहानिरीक्षकांच्या अधिनस्त सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात सन २०२० ते २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीतील नोंदणी झालेल्या सर्व दस्तांची तपासणी करण्याबाबत ८ फेब्रुवारी राेजी पत्राने कळविले आहे. ही तपासणी नोंदणी अधिनियम १९६१ च्या नियम ४४ (आय) मधील तरतुदींच्या अनुपालनाच्या अनुषंगानेच न करता सर्वंकष तपासणी एक वर्षाच्या आत पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे कळविले आहे. तपासणीचा अंतिम अहवाल शासनाला प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.”
नक्की वाचा : मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका; मनाेज जरांगे पाटलांचा पुन्हा सरकारला इशारा