Radhakrishna Vikhe Patil : शासकीय नोकरी ही सेवा; जनतेचा विश्वास जपण्याचे काम करा : पालकमंत्री डॉ. विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : शासकीय नोकरी ही सेवा; जनतेचा विश्वास जपण्याचे काम करा : पालकमंत्री डॉ. विखे पाटील

0
Radhakrishna Vikhe Patil : शासकीय नोकरी ही सेवा; जनतेचा विश्वास जपण्याचे काम करा : पालकमंत्री डॉ. विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil : शासकीय नोकरी ही सेवा; जनतेचा विश्वास जपण्याचे काम करा : पालकमंत्री डॉ. विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : नगर : “शासकीय सेवेत (Government Services) दाखल होणाऱ्या तरुणांसाठी ही संधी केवळ नोकरी (Jobs) नसून जनतेच्या सेवेसाठीची मोठी जबाबदारी आहे. या तरुणांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे, त्यांना दिलासा देण्याचे व प्रशासनावरील जनतेचा विश्वास दृढ करण्याचे काम करावे,” असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले. शासनाच्या कामकाजात ‘झिरो पेंडन्सी’ हा उपक्रम राबवून प्रत्येक विभागाचे काम अधिक लोकाभिमुख करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

अवश्य वाचा: ११ बालकांच्या मृत्यूमुळे कफ सिरपच्या वापराबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ॲडव्हायजरी केली जारी

३३८ उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटप

लोणी येथे झालेल्या जिल्हास्तरीय नियुक्ती आदेश वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या सोहळ्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस झालेले व अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या ३३८ उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले. यावेळी आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते आदी उपस्थित होते.

नक्की वाचा : निलेश घायवळचा आणखी एक प्रताप समोर; दोन जिल्ह्यात काढली ओळखपत्र

डॉ. विखे पाटील म्हणाले, (Radhakrishna Vikhe Patil)

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका दिवसात तब्बल १० हजार तरुणांना शासकीय सेवेत दाखल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. “ही केवळ नियुक्ती नसून राज्याच्या विकासासाठी योगदान देण्याची संधी आहे.  पूर्वी अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया क्लिष्ट व वेळखाऊ होती, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ती जलद, सुलभ व पारदर्शक करण्यात आली आहे. आता जिल्हाधिकारी स्तरावरच अनुकंपा नियुक्ती अधिकार दिल्याने जलद व पारदर्शक नियुक्ती प्रक्रिया पार पडणार आहे,” असे ते म्हणाले.


शासनाने आतापर्यंत सुमारे ५० हजार शासकीय पदे पारदर्शक पद्धतीने भरली आहेत, यात कुठेही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही, हे अधोरेखित करताना त्यांनी नव्या पिढीला प्रशासनातील उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून काम करण्याचे आवाहन केले. तसेच, तरुणांनी आपल्या आई-वडिलांची काळजी घेण्याचे व त्यांचा सांभाळ करण्याचे कर्तव्यही विसरू नये, असे आवाहनही त्यांनी  केले.


जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, या रोजगार मेळाव्याच्या यशासाठी सर्व विभागप्रमुखांनी एकत्रितपणे मेहनत घेतली असून, यातून अनेक बेरोजगार युवकांना शाश्वत रोजगार मिळणार आहे. “प्रशासनात दाखल होणारे हे तरुण सचोटीने काम करून आपल्या राज्याच्या विकासात निश्चितच मोलाचे योगदान देतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात २१ उमेदवारांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.