Radhakrishna Vikhe Patil : आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे : विखे पाटील 

Radhakrishna Vikhe Patil : आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे : विखे पाटील 

0
Radhakrishna Vikhe Patil : आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे : विखे पाटील 
Radhakrishna Vikhe Patil : आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे : विखे पाटील 

Radhakrishna Vikhe Patil : राहुरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Election)नगरपालिका निवडणुकीत (Municipal Elections) आपल्याला महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले. राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आदरांजली सभेत ते बोलत होते. राहुरीत पांडुरंग लॉन्स येथे झालेल्या या कार्यक्रमात सभेपूर्वी आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांना आदरांजली वाहण्यात आली. युवानेते अक्षय कर्डीले, ज्येष्ठ नेते अँड. सुभाष पाटील, नामदेव पाटील ढोकणे, सुरसिंग पवार, श्याम काका निमसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

अवश्य वाचा: दुबार मतदान कसं रोखलं जाणार? निवडणूक आयोगाने सांगितला प्लॅन

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले,

शिवाजीराव कर्डिले हे जनतेशी समरस झालेले नेते होते. त्यांची जनतेशी नाळ जोडलेली होती. त्यांच्यात आणि आमच्यात मतभेद झाले असले तरी आमचे मैत्री कधीही तुटली नाही. त्यांना मतदार संघाच्या विकासाचा ध्यास होता. लोकांच्या मतदार संघातील प्रश्नांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मुळा धरणाची उंची वाढवण्याचा व गाळ काढण्याचा निर्णय त्यांच्या आग्रहाखातरच घेतलेला आहे. धोबीपछाड कसे करायचे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. मतदारसंघातील लोक हाच माझा परिवार असे ते सतत म्हणत होते. विश्रांती हा शब्द त्यांच्या शब्द कोषातच नव्हता. आता आपली जबाबदारी वाढली आहे.

नक्की वाचा : नगरपालिका,नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला;आचारसंहिता लागू

अक्षय कर्डिलेच्या मागे ताकद उभी केली पाहिजे (Radhakrishna Vikhe Patil)

निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. राहुरी नगरपालिकेवर व स्थानिक स्वराज्य संस्थावर भगवा झेंडा फडकावायचा आहे. मी शिवाजी कर्डीले या भूमिकेतून निवडणूक लढवावी लागेल. आता रुसायचे नाही. महायुती सरकारची दानत मोठी आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना 54 कोटी रुपये जमा झाले. महायुती सरकारची निर्णय क्षमता मोठी आहे. महायुतीची ताकद दाखवली पाहिजे. अक्षय कर्डिलेच्या मागे ताकद उभी केली पाहिजे. वांबोरी चारी, मानोरी केटी वेअर, मुळा कार्यक्षेत्र पाणी नियोजन आम्ही चांगले केले. जायकवाडीत तीस टक्के पाणी शिल्लक राहिले. मुळा धरणातील गाळ काढणार आहोत. धरणाच्या दरवाजाची उंची वाढवणार आहोत. विद्यापीठ, मुळा धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविणार आहोत.


माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील म्हणाले, मैत्रीला वय नाही. माझी व त्यांची मैत्री वेगळीच होती. अक्षय कर्डीलेंची जबाबदारी आम्ही पूर्णपणे घेत आहोत. नगरपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी समितीची स्थापना करणार आहोत. एकनिष्ठ कार्यकर्ते यांचाच विचार होईल. महायुतीचा झेंडा फडकवणे  हीच खरी श्रध्दांजली असेल. अक्षय कर्डिलेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवू. शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी विखे पाटील परिवार निश्चितच सोबत आहे. भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, माजी आमदार संग्राम जगताप, महेंद्र तांबे, शिवाजी सागर, संदीप रासकर ,सुभाष गायकवाड अण्णा बलमे आदींची दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांना आदरांजली वाहणारी भाषणे झाली. आदरांजली सभेस मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या विषयीची चित्रफीत दाखवताना सर्व सभागृह भावूक झाले होते.