Radhakrishna Vikhe Patil : ‘वाळूच्या गाड्या चालू द्या,थोडसं दुर्लक्ष करा.काही फरक पडत नाही. सगळे आपलेच लोक आहेत’,असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे नेते तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सोलापूरमधील (Solapur) एका कार्यक्रमात केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. विरोधकांनी देखील टीकेची झोड उठवली. यानंतर आता विखे पाटील यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण (Explanation) दिलं आहे. “सर्वच गोष्टी गांभीर्याने घेऊ नका. काही गोष्टी आपण गंमतीने बोलतो”, असं म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सारवासारव केली आहे.
नक्की वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलं स्पष्टीकरण (Radhakrishna Vikhe Patil)
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “तुम्ही सर्वच गोष्टी गांभीर्याने घेऊ नका. काही गोष्टी आपण गंमतीने बोलतो. मात्र,वाळूच्या घोरणांबाबत आम्ही अतिशय कडक राहिलो आहोत. धोरणाची अंमलबजावणी करताना कुठेही कसूर केलेला नाही. प्रसंगी आम्ही अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली. नदीतून वाळू काढण्याला माझा कायमच विरोध राहिलेला आहे”,असं स्पष्टीकरण त्यांनी दिले.
अवश्य वाचा : मोठी बातमी!यूपीएससी परीक्षेची जाहिरात निघाली
सोलापूरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले ? (Radhakrishna Vikhe Patil)
विखे पाटील सोलापूरमध्ये म्हणाले होते की, “आधीच्या काळात शनिवारी एक चित्रपट लागायचा. तेव्हा चित्रपट पाहण्याचा एक वेगळाच आनंद असायचा. मी १९७५ ला मॅट्रीक पास झालो. तेव्हा चित्रपट पाहण्याचा वेगळा आनंद असायचा. आता चित्रपट पाहण्यासाठी कोणी मांडी घालून बसणार का? आता तंत्रज्ञान बदललं आहे. खरं तर आपण एखाद्या दिवशी आनंदाच्या विश्वात गेलं पाहिजे. अन्यथा दररोज तेच-तेच हा गेला, तो आला. अन्यथा वाळूच्या ट्रक पकडल्या असं ऐकावं लागतं. आपली जिल्हा परिषद आहे. त्यासाठी मला माहिती आहे ना. वाळूच्या ट्रक आहेत, क्रशरच्या गाड्या आहेत. सोलापूर यासाठी फार प्रसिद्ध आहे. मी मागे एकदा जिल्हाधिकाऱ्यांना म्हटलं होतं की, दुर्लक्ष करा थोडसं. गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही. सगळे आपलेच लोक आहेत”,असं विधान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं होतं.