Radhakrishna Vikhe Patil:अजित पवारांकडून कामाच्या व्यापात राहिले असेल;पुण्यातील जमीन प्रकरणावरुन विखे पाटलांचा टोला

0
Radhakrishna Vikhe Patil:अजित पवारांकडून कामाच्या व्यापात राहिले असेल;पुण्यातील जमीन प्रकरणावरुन विखे पाटलांचा टोला
Radhakrishna Vikhe Patil:अजित पवारांकडून कामाच्या व्यापात राहिले असेल;पुण्यातील जमीन प्रकरणावरुन विखे पाटलांचा टोला

नगर : पुणे जमीन प्रकरणात (Pune land case) अजित पवारांना जेव्हा कुण कुण लागली होती तेव्हाच त्यांनी हे प्रकरण थांबवले असते तर असे झाले नसते. पण,त्यांच्या कामाच्या व्यापात काही निर्णय परस्पर पण होतात, असा खोचक टोला राज्याचे मंत्री तथा भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) लगावला आहे. तसेच,आता मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, लवकरच सर्व समोर येईल, असेही त्यांनी म्हटले.

नक्की वाचा: धनंजय मुंडेंनी मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील केली ;मनोज जरांगेंचा गंभीर आरोप 

पुण्यातील जमिनीचे प्रकरण काय ? (Radhakrishna Vikhe Patil)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील कोंढवा परिसरात ४० एकर जमिनीचा गैरव्यवहार केल्याचे आता उघडकीस आले आहे. त्यावरुन, विरोधक आक्रमक झाले असून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, या व्यवहाराशी माझा काहीही संबंध नाही.तीन-चार महिन्यांपूर्वीच मला अशी कुण कुण कानावर आली होती, तेव्हाच मी असलं काहीही केलेलं मला चालणार नाही,असे म्हटले होते. त्यामुळे, या जमीन व्यवहाराची संपूर्ण माहिती घेऊन बोलेन असेही अजित पवारांनी स्पष्ट केले होते. 

अवश्य वाचा:  …तर माझ्यासह जरांगेंची नार्को टेस्ट अन् ब्रेन मॅपिंग करा- धनंजय मुंडे  

‘विरोधकांना काहीच काम उरलेले नाही’  (Radhakrishna Vikhe Patil)

आता,याप्रकरणी मंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. तसेच विरोधकांना काही काम उरले नसल्याने फक्त काहीही झाले तरी ते राजीनामा मागत असतात,असे म्हणत विरोधकांच्या मागणीवर देखील विखे पाटील यांनी पलटवार केला आहे.