Radhakrishna Vikhe Patil:देवेंद्र फडणवीसांवर टीका करून मराठा आरक्षण मिळणार आहे का ?;राधाकृष्ण विखे पाटलांचा मनोज जरांगेंना प्रश्न

0
Radhakrishna Vikhe Patil:देवेंद्र फडणवीसांवर टीका करून मराठा आरक्षण मिळणार आहे का ?;राधाकृष्ण विखे पाटलांचा मनोज जरांगेंना प्रश्न
Radhakrishna Vikhe Patil:देवेंद्र फडणवीसांवर टीका करून मराठा आरक्षण मिळणार आहे का ?;राधाकृष्ण विखे पाटलांचा मनोज जरांगेंना प्रश्न

नगर : देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका करून मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळणार आहे का? असा प्रश्न मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना विचारला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही, ही शरद पवारांनी जाहीर भूमिका मांडली. मराठ्यांना आरक्षण द्यायला पवारांचा विरोध आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील का बोलत नाहीत ? असाही प्रश्न विखे पाटील यांनी केला. विखे पाटील धाराशिव मध्ये माध्यमांशी बोलत होते.

नक्की वाचा : “आमच्या कुटुंबाला संघर्ष पाचवीलाच पुजलेला” – धनंजय मुंडे
एकनाथ शिंदेच नाही तर सरकारमधील सर्वच मराठा नेत्यांना संपवण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केला होता. त्यावर राधाकृष्ण विखे पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

“देवेंद्र फडणवीसांच्या काळातच मराठ्यांना आरक्षण मिळालं”  (Radhakrishna Vikhe Patil)

देवेंद्र फडणवीसावर टीका करणे, मराठा आरक्षणाला फडणवीसांचा विरोध आहे असं सांगणे आणि त्याला जातीय रंग देणे हा प्रकार चुकीचा असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. फडणवीसांच्या काळातच मराठ्यांना आरक्षण मिळालं होतं. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनीच मराठा आरक्षणाबाबत भूमिका घेतली होती. आजही महायुतीची तीच भूमिका आहे, असं विखे पाटील म्हणाले.

अवश्य वाचा : प्रिया बापट पहिल्यांदाच झळकणार पोलिसाच्या भूमिकेत!  

शरद पवारांवर तुम्ही का बोलत नाही ?- विखे पाटील   (Radhakrishna Vikhe Patil)

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्याला आरक्षण दिलं आणि ते सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं. अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे उद्धव ठाकरे असतील, त्यांचे नेते शरद पवार असतील, त्यांनी आरक्षणासंदर्भात योग्य भूमिका न घेतल्याने आरक्षण घालवलं. स्वतः शरद पवारांनी अनेक वेळा सांगितले की, मराठ्यांना आरक्षण देता येत नाही. त्याबद्दल जरांगे पाटील कधीच बोलत नाहीत. फक्त फडणवीस यांच्यावर टीका केली की आरक्षण मिळणार आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.