Radio : आकाशवाणीचे सायंकालीन प्रसारण पुन्हा सुरू; स्वातंत्र्य दिनापासून श्रोत्यांसाठी विविध कार्यक्रमांची मेजवानी

Radio : आकाशवाणीचे सायंकालीन प्रसारण पुन्हा सुरू; स्वातंत्र्य दिनापासून श्रोत्यांसाठी विविध कार्यक्रमांची मेजवानी

0
Radio

Radio : नगर : गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले आकाशवाणी (Radio) नगर केंद्राचे सायंकालीन प्रसारण १५ ऑगस्टपासून (15 August) पुन्हा सुरू होणार आहे. आकाशवाणी महानिर्देशनालय दिल्ली (Delhi) आणि अपर महानिर्देशनालय मुंबई (Mumbai) यांनी नुकतीच यासाठी परवानगी दिली आहे, अशी माहिती आकाशवाणी नगर केंद्राचे कार्यक्रम विभागप्रमुख राजेंद्र दासरी यांनी दिली.

नक्की वाचा: मनिष सिसोदिया यांना’सर्वोच्च’न्यायालयाचा दिलासा;दिल्ली मद्यधोरण प्रकरणात जामीन मंजूर

सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे सायंकालीन प्रसारणास मंजुरी

आकाशवाणी नगर केंद्राची स्थापना १४ एप्रिल १९९१ मध्ये झाली असून, तेव्हापासून विविध कार्यक्रमांद्वारे या केंद्राने श्रोत्यांचे मनोरंजन केले आहे. श्रोत्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या या केंद्राचे सायंकालीन प्रसारण बंद झाल्यामुळे स्थानिक कलाकार आणि श्रोते नाराज होते. तसेच सायंकालीन प्रसारणात स्थानिक कार्यक्रमाऐवजी मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित होत होते. त्यामुळे स्थानिक कलाकार, विचारवंत, तसेच आकाशवाणीचे नैमित्तिक उद्घोषक यांना मिळणार्‍या संधी कमी झाल्या होत्या. राजेंद्र दासरी यांनी वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे सायंकालीन प्रसारणास मंजुरी मिळाली असून १५ ऑगस्टपासून पूर्वीप्रमाणेच प्रसारण पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे आता नगर शहर आणि जिल्ह्यातील श्रोत्यांना लोकसंगीत, नारीशक्ती, चला करूया पर्यटन, कौटुंबिक श्रुतिका-विचारमंथन, लोकजागर, व्यक्तीवेध, आपली आवड आपकी पसंद, ओळख कायद्याची, हॅलो गीतबहार, सुहाना सफर, रजनीगंधा, हॅलो डॉक्टर, युवावाणी किसानवाणी, आमचं शेत आमचा परिसर, शास्त्रीय संगीत इत्यादी लोकप्रिय कार्यक्रमांची मेजवानी श्रोत्यांना मिळणार आहे.

अवश्य वाचा : कांद्याच्या हमीभावाची मागणी; इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक

नगर केंद्रातर्फे पाठवण्यात आला होता प्रस्ताव (Radio)

आकाशवाणी नगर केंद्रातर्फे सायंकालीन स्थानिक प्रसारण सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आला होता. त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर यश मिळालं असून, १५ ऑगस्टपासून आकाशवाणी नगर केंद्रावरील सायंकालीन स्थानिक प्रसारण पुन्हा सुरू होणार आहे, यामुळे स्थानिक कलाकारांना संधी मिळण्यास मदत होणार असल्याची माहितीही विभागप्रमुख राजेंद्र दासरी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here