Rafale deal:भारत-फ्रान्समध्ये आज राफेल करार;२६ राफेल सागरी विमानांची खरेदी होणार 

0
Rafale deal:भारत-फ्रान्समध्ये आज राफेल करार;२६ राफेल सागरी विमानांची खरेदी होणार 
Rafale deal:भारत-फ्रान्समध्ये आज राफेल करार;२६ राफेल सागरी विमानांची खरेदी होणार 

नगर : भारत आज (ता. २८) फ्रान्ससोबत २६ राफेल मरीनसाठी (6 Rafael Marine) करार (Agreement) करणार आहे.दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये हा करार होईल. या करारानुसार,भारत फ्रान्सकडून २२ सिंगल सीटर विमाने आणि ४ डबल सीटर विमाने खरेदी करेल. ही विमाने अणुबॉम्ब डागण्याची क्षमता असलेली असतील. फ्रान्ससोबतचा हा करार सुमारे ६३ हजार कोटी रुपयांना होत आहे. शस्त्रास्त्र खरेदीच्या बाबतीत भारताचा फ्रान्ससोबतचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार आहे.

नक्की वाचा : पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला मोठा दणका;घेतले ५ मोठे निर्णय  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २३ एप्रिल रोजी झालेल्या सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीच्या (सीसीएस) बैठकीत या विमानाच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली होती.

हेही पहा : ‘यूपीएससीकडे येताना फक्त लाल दिव्याची गाडी पाहून येऊ नये’ – ओंकार खुंटाळे

‘राफेल मरीन आयएनएस विक्रांतवर तैनात असतील’ (Rafale deal)

भारत आयएनएस विक्रांतवर राफेल सागरी विमान तैनात करणार आहे. विमान उत्पादक कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने भारताच्या गरजेनुसार या विमानांमध्ये अनेक बदल केले आहेत. यामध्ये जहाजविरोधी हल्ला,अण्वस्त्रे डागण्याची क्षमता आणि १० तासांपर्यंत उड्डाण रेकॉर्डिंग यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.याशिवाय, कंपनी भारताला शस्त्र प्रणाली,सुटे भाग आणि विमानांसाठी आवश्यक साधने देखील पुरवेल. या विमानांची डिलिव्हरी २०२८-२९ मध्ये सुरू होईल आणि सर्व विमाने २०३१-३२ पर्यंत भारतात पोहोचतील.

भारताची फ्रान्सकडून ३६ राफेल विमानांची खरेदी (Rafale deal)

राफेल मरीन पूर्वी भारताने फ्रान्सकडून हवाई दलासाठी ३६ राफेल जेट विमाने देखील खरेदी केली आहेत. २०१६ मध्ये झालेल्या या करारातील सर्व विमाने २०२२ मध्ये भारतात पोहोचली. ही विमाने हवाई दलाच्या अंबाला आणि हशिनारा हवाई तळावरुन चालवली जातात. हा करार ५८ हजार कोटी रुपयांना झाला. राफेल मरीन विमानाची वैशिष्ट्ये हवाई दलाच्या राफेल विमानांपेक्षा अधिक प्रगत आहेत.