Rahata | राहाता तालुक्यातील मुदत संपलेल्या २५ ग्रामपंचायतीवर आजपासून प्रशासकराज

0

Rahata | राहाता : राहाता (Rahata) तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या मुदती ८ फेब्रुवारीला संपल्याने या ग्रामपंचायतीवर प्रशासकाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १५१ मध्ये जर निवडणूक आयोगाला वेळापत्रकानुसार ग्रामपंचायत निवडणुका घेणे शक्य झाले नाही, तर राज्यशासनाला राजपत्रातील अधिसूचनेनुसार अशा ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करता येतात. ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचे अधिकार अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व अधिकार गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. त्यानुसार राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विवेक गुंड हे प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहेत.

हेही वाचा – राहुरी नगरपरिषदेचा मोठा ठराव; दीड तास मोबाईलसह मनोरंजनांची माध्यमे राहणार बंद

यांची नियुक्ती (Rahata)

अस्तगाव, एकरूखे व रांजणगाव खुर्द या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी बाळासाहेब काशिनाथ गागरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ममदापूर व नांदूर ग्रामपंचायतीवर शाखा अभियंता मयूर नेमिचंद मुनोत यांची नियुक्ती, जळगाव आणि रामपुरवाडी ग्रामपंचायतीवर सांख्यिकी विभागाचे विस्तार अधिकारी रामदास लक्ष्मण गंभीरे यांची नियुक्ती, भगवतीपूर आणि कोल्हार बुद्रुकला शिक्षण विस्तार अधिकारी राजेश दत्तात्रय पावसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर चंद्रपूर आणि हसनापूर ग्रामपंचायतीवर शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू यादव कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

अवश्य वाचा – ‘गोंधळ’चा जागतिक डंका! ; ’फिप्रेस्को’ या मानाच्या अवॉर्डने मराठी कलेचा गौरव

प्रशासक म्हणून नियुक्ती (Rahata)

शिंगवे ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी विनोद भागुराव भिसे यांची नियुक्ती, बाभळेश्वर, तिसगाव, आडगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी कृषी विभागाचे विस्तार अधिकारी किरण दत्तात्रय अरगडे यांची नियुक्ती, हनमंतगाव, पाथरे बुद्रुक या दोन्ही ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सांख्यिकी विभागाचे विस्तार अधिकारी अक्षय संभाजी नायकू यांची नियुक्ती, गोगलगांव, लोणी खुर्द, लोणी बुद्रुक या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी सुनील गुलाबराव माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपळवाडी व सावळीविहीर खुर्द या दोन्ही ग्रामपंचायतीवर शाखा अभियंता नानासाहेब महारुद्र वाघमारे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

हे पहा – जिल्हा परिषदेवर भाजपचा डंका, शिवसेना दोन नंबरला, दादांची राष्ट्रवादी तीन नंबरला

लवकरच निवडणुका (Rahata)

वाळकी, पिंपरी लोकई, केलवड या तिन्ही गावांसाठी प्रशासक म्हणून कृषी विभागाच्या विस्तार अधिकारी जयश्री बापूसाहेब जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशा ११ जणांची २५ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे प्रशासक आज (ता. ९)पासून ग्रामपंचायतीचा कारभार पाहणार आहेत. ज्या वेळी निवडणुका होतील त्या वेळी निवडून आलेले ग्रामपंचायतीचे पदाधिकारी काम पाहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here