Rahibai Popere : पद्मश्री राहीबाई पोपेरे रमल्या ग्राम स्वच्छतेच्या कामात

Rahibai Popere : पद्मश्री राहीबाई पोपेरे रमल्या ग्राम स्वच्छतेच्या कामात

0
Rahibai Popere : पद्मश्री राहीबाई पोपेरे रमल्या ग्राम स्वच्छतेच्या कामात
Rahibai Popere : पद्मश्री राहीबाई पोपेरे रमल्या ग्राम स्वच्छतेच्या कामात

Rahibai Popere : अकोले : ‘आपले गाव आणि आपली माती’ याविषयी अत्यंत भावनिक आणि एकरूप असलेल्या पद्मश्री राहीबाई पोपेरे (Rahibai Popere) यांनी बचत गटातील (Mahila Bachat Gat) महिलांसह ग्रामस्वच्छतेची मोहीम (Gram Swachhata Mission) हाती घेतली.

नक्की वाचा : लोकसभेत मंजूर झालेल्या ‘वक्फ बोर्ड’ विधेयकाला विरोध का ?

संत गाडगेबाबा महाराजांनी महाराष्ट्रात चळवळीचे दिले रूप

स्वच्छतेतून आरोग्य या संकल्पनेला संत गाडगेबाबा महाराजांनी महाराष्ट्रात चळवळीचे रूप दिले. हाच विषय पुढे घेऊन जात सालाबादप्रमाणे गावात भरणाऱ्या काशाई मातेच्या यात्रेनिमित्त ग्रामस्वच्छतेची मोहीम आपल्या बचत गटातील मैत्रिणींना सोबत घेत पद्मश्रींनी हाती घेतली. देशातील गावरान बियाण्यांची पहिली बीजबँक शेतकऱ्यांसाठी स्थापन करणाऱ्या व जगभर ‘सीडमदर’ म्हणून लौकिक असणाऱ्या राहीबाई आजही आपल्या गावातील प्रत्येक घटकाशी एकरूप असल्याचेच यावरून दिसते.

Rahibai Popere : पद्मश्री राहीबाई पोपेरे रमल्या ग्राम स्वच्छतेच्या कामात
Rahibai Popere : पद्मश्री राहीबाई पोपेरे रमल्या ग्राम स्वच्छतेच्या कामात
अवश्य वाचा : रस्त्याच्या वादातून लोखंडी पाईपने मारहाण; गुन्हा दाखल

गावात होणाऱ्या काशाई मातेच्या यात्रेनिमित्त ग्रामस्वच्छतेची मोहीम (Rahibai Popere)

दरवर्षी गावात होणाऱ्या काशाई मातेच्या यात्रेनिमित्त त्या आजही ग्रामस्वच्छतेची मोहीम हाती घेतात. ज्या रस्त्याने ग्रामदेवतेची मिरवणूक जाणार आहे ते सर्व रस्ते त्या आपल्या बचत गटातील महिलांना सोबत घेत दरवर्षी मनापासून साफ करत असतात. त्यांच्या या कृतीतून समाजाने आदर्श घेण्यासारखा आहे. गावातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा, मंदिरे व सर्व रस्ते यानिमित्त त्यांनी स्वच्छ केले. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सुद्धा जमिनीवर पाय ठेवून आपल्या जन्मभूमीशी प्रामाणिकपणा व एकनिष्ठ पणा कसा जपावा हे त्यांच्या वैयक्तिक कृतीतून दिसून येते.