Rahul Gandhi : राहाता : निवडणूक आयोगावर (Election Commission) टीका करण्याची खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची फक्त नौटंकी सुरू आहे. हा बालिशपणा करण्याऐवजी त्यांनी शिल्लक राहिलेली पक्षाची प्रतिमा सांभाळावी, असा सल्ला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिला.
अवश्य वाचा: “मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावे लागेल”-अजित पवार
माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की,
ज्यांना मतदार याद्यांवर आक्षेप आहेत. ते लोक इतक्या दिवस काय करीत होतेॽ खासदार राहुल गांधी यांनी यापूर्वी निवडणूक आयोगावर आरोप केले. आयोगाने त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. ते का देत नाहीत. फक्त मुक्ताफळ उधळण्याचे काम त्यांचे सुरू असल्याची टीका करून मतदार याद्यांची काही प्रक्रिया असते. उगाच काही कुरापती काढून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न त्यांच्या कडून सुरू आहे. अशा प्रकारामुळेच काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपत चालल असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
नक्की वाचा : शहरातील मुस्लिम महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा
बोगस दाखले दिल्याचे लक्षात आल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई (Rahul Gandhi)
क्षेत्रीय स्तरावर नेमलेल्या समितीने छाननी केल्यानंतरच कुणबी प्रमाणपत्राचे वाटप मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधीक स्वरूपात करण्यात आल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, खोटे प्रमाणपत्र दिले जाणार नाहीत तशा सूचनाही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. बोगस दाखले दिल्याचे जात पडताळणी समितीच्या लक्षात आले तर संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देवून, कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपावर ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेण्याचे कारण नाही. बोगस प्रमाणपत्र वाटप झाल्याच लक्षात आल्यास ते तात्काळ रद्द होतील ही सरकारची भूमिका आहे आणि भुजबळ यांची सुध्दा तिच मागणी असल्याकडे विखे पाटील यांनी लक्ष वेधले.मराठा समाजाच्या संघटनानी छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेल्या परिषदेच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना त्यांच्यकडून काही सूचना आल्यास त्याचे स्वागत करू असे मंत्री विखे पाटलांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे यांच्या चलो दिल्ली घोषणेवर भाष्य करताना मंत्री विखे यांनी सांगितले की,त्यांचे दिल्लीत जाणे हे मराठा अधिवेशनाच्या निमिताने असावे. अधिवेशन सरकारच्या विरोधात नाही.सरकारने घेतलेल्या निर्णयावर जरांगे पाटील समाधानी असल्याची भावना बोलून दाखवली. अलमट्टी धरणाची उंची वाढविण्या संदर्भात कर्नाटक सरकराने परस्पर पावले उचलली तर राज्य सरकार न्यायालयात अवमान याचिका दाखल करेल, अशी भूमिका मंत्री विखे पाटील यांनी मांडली.