Rahul Gandhi:’त्यांची नियत खराब होती,म्हणून त्यांच्या हातून अनावरण झालेला पुतळा कोसळला’,राहुल गांधींची टीका

0
Rahul Gandhi:'त्यांची नियत खराब होती,म्हणून त्यांच्या हातून अनावरण झालेला पुतळा कोसळला',राहुल गांधींची टीका
Rahul Gandhi:'त्यांची नियत खराब होती,म्हणून त्यांच्या हातून अनावरण झालेला पुतळा कोसळला',राहुल गांधींची टीका

नगर : भाजप सरकारची नियत खराब होती म्हणून त्यांच्या हातून बसवलेला पुतळा कोसळला,अशी टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

नक्की वाचा : मोठी बातमी!मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ

नेमकं काय म्हणाले ? (Rahul Gandhi)

यावेळी राहुल गांधी म्हणाले की,आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी इथे जमलो आहोत. हा केवळ एक पुतळा नाही. तर एक विचार आहे. पुतळा तेव्हाच बनवला जातो, जेव्हा आपण त्या व्यक्तीच्या विचारांचा आदर करतो. छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर ज्या विचारांसाठी लढले, तोच विचार आपण पुढे घेऊन जाणार नसू तर आज या पुतळ्याच्या अनावरणाचा काहीही अर्थ राहणार नाही, असं ते म्हणालेत

अवश्य वाचा : शिवाली परब अभिनीत ‘मंगला’ चित्रपटाची तारीख आली समोर,ऍसिड हल्ल्यातील गूढ उलगडणार    

‘भाजप संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहे'(Rahul Gandhi)

ते पुढे म्हणाले की, भारतात सध्या दोन विचारधारांची लढाई सुरू आहे.एक विचारधारा जी संविधानाचं तसेच समानतेचं रक्षण करते तर दुसरी विचारधारा संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहे’. ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता,तेव्हा भाजपच्या विचारधारेच्या लोकांनी त्यांचा राज्याभिषेक होऊ नये,यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे आज सुरु असलेली विचारधारेची लढाई ही खूप जुनी आहे. या विचारधारेविरोधात शिवाजी महाराजदेखील लढले होते आणि आता याच विचारधारेच्या विरोधात काँग्रेस पक्षही लढत आहे. ज्याप्रकारे या लोकांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, त्याप्रमाणे आताच्या सत्ताधाऱ्यांनी संसदेच्या उद्घाटनाला आदिवासी राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना बोलवलं नाही”,असंही त्यांनी नमूद केलं.

यावेळी गांधी यांनी भाजपलाही लक्ष्य केलं.“भाजपाचे लोक सकाळी उठतात आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचं संविधान कसं संपवायचं यासाठी प्रयत्न करतात. हे लोक भारतातील विविध संस्थांवर आक्रमण करतात. लोकांना घाबरवतात आणि इतकं करूनही परत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतात. याला काहीही अर्थ नाही. जर तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तर नतमस्त होत असाल, तर तुम्हाला संविधानाचे रक्षण करावंच लागेल”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here