Rahul Gandhi:ठरलं तर मग! राहुल गांधींची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी

२०१४ आणि २०१९ साली काँग्रेसला आवश्यक संख्या नसल्याने विरोधी पक्षनेतेपद मिळालं नव्हतं. यंदा मात्र त्यांना ही संधी मिळाली असून त्या ठिकाणी राहुल गांधी यांची वर्णी लागली आहे.

0
Rahul Gandhi:ठरलं तर मग! राहुल गांधींची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Rahul Gandhi:ठरलं तर मग! राहुल गांधींची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी

नगर : लोकसभेतील विरोधी पक्षनेता (Leader of Opposition) कोण असेल या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण काँग्रेसचे खासदार (Congress MP) राहुल गांधी यांची लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीनं (India Aghadi) यावर शिक्कामोर्तब केलं आहे. राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी दिली.

नक्की वाचा : कर्नाटकमध्ये दूध महागलं!वर्षभरात दुधाच्या दरात दुसऱ्यांदा वाढ

२०१४ आणि २०१९ साली काँग्रेसला आवश्यक संख्या नसल्याने विरोधी पक्षनेतेपद मिळालं नव्हतं. यंदा मात्र त्यांना ही संधी मिळाली असून त्या ठिकाणी राहुल गांधी यांची वर्णी लागली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षांना पत्र लिहून हा निर्णय कळवला आहे. राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला असून त्यांनी वायनाडच्या खासदारपदाचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील. काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रोटेम स्पीकरना पत्र लिहून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी असतील अशी माहिती दिली आहे.त्याआधी काँग्रेस पक्षाची एक बैठक झाली असून त्यामध्ये राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या गदारोळात हा निर्णय घेण्यात आला.

अवश्य वाचा : सावधान!कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर विदर्भातही मुसळधार बरसणार 

विरोधी पक्षनेतेपद भुषवणारे तिसरे गांधी (Rahul Gandhi)

राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झालेले गांधी घराण्यातील तिसरे सदस्य आहेत. यापूर्वी राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी हे पद भूषवलं होतं. ९ जून रोजी झालेल्या काँग्रेस संसदीय दलाच्या बैठकीत राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड करावी, यासंदर्भातील ठराव पारीत करण्यात आला होता. मात्र, मला यासंदर्भात विचार करण्यासाठी वेळ द्या, असे राहुल गांधी म्हणाले होते. अखेर मंगळवारी (ता.२५) राहुल गांधी यांची लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली.

दहा वर्षानंतर लोकसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता (Rahul Gandhi)

लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद गेल्या १० वर्षांपासून रिक्त होते, कारण गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ मिळालं नव्हतं. आता १० वर्षांनंतर राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावणार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ९९ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे हे  राहुल गांधींना हे पद मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here