Rahul Gandhi: मतासाठी नरेंद्र मोदींना नाचायला सांगितले तर ते नाचतीलही- राहूल गांधी  

0
Rahul Gandhi: मतासाठी नरेंद्र मोदींना नाचायला सांगितले तर ते नाचतीलही- राहूल गांधी  
Rahul Gandhi: मतासाठी नरेंद्र मोदींना नाचायला सांगितले तर ते नाचतीलही- राहूल गांधी  

Rahul Gandhi : “जर तुम्ही नरेंद्र मोदींना तुमच्या मतांच्या बदल्यात नाचायला सांगितले, तर ते व्यासपीठावर नाचतील”,असं वक्तव्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी मुझफ्फरपूरमध्ये केलं आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यासोबत एका संयुक्त सभेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) हे आरोप केलेत. 

नक्की वाचा: लाडक्या बहिणींना आता शेवटची संधी, E-KYC ची मुदत काही दिवसातच संपणार
बिहार विधानसभा निवडणूक प्रचाराची जोरदार सुरुवात करताना, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आणि ते “मतांसाठी काहीही” करत असल्याचा आरोप केला.विधानसभा निवडणुकीला अवघा एक आठवडा उरला असताना, राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली.

‘त्यांना फक्त तुमची मते हवी आहेत’ – राहुल गांधी  (Rahul Gandhi)

बिहारी लोकांसाठी सर्वात मोठा सण असलेल्या छठ पूजेकडे राहुल गांधींनी लक्ष वेधलं आहे. ते म्हणाले की, भाविक दिल्लीतील प्रदूषित यमुनेत प्रार्थना करत होते, तर पंतप्रधानांनी खास त्यांच्यासाठी बनवलेल्या विशेष तलावात डुबकी मारली.“नरेंद्र मोदी त्यांच्या स्विमिंग पूलमध्ये स्नान केले. त्यांचा यमुनेशी काहीही संबंध नाही. त्यांचा छठ पूजेशी काहीही संबंध नाही. त्यांना फक्त तुमची मते हवी आहेत”.

अवश्य वाचा: लवकरच साखरेच्या दरात वाढ होणार? देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे शिफारस 

“रिमोट कंट्रोल भाजपच्या हातात आहे”   (Rahul Gandhi)

“नीतीशजींचा चेहरा वापरला जात आहे. पण,रिमोट कंट्रोल भाजपच्या हातात आहे. तुम्ही असा विचार करू नका की, ते सर्वात मागासलेल्या लोकांचा आवाज ऐकतात. भाजपच्या हातात रिमोट कंट्रोल आहे आणि त्यांचा सामाजिक न्यायाशी काहीही संबंध नाही”, असे राहुल गांधी नितीश कुमारांबाबत बोलताना म्हणाले.