Narendra Modi : बापरे ! पंतप्रधान मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स ?

यवतमाळमध्ये आज मोदींची जाहीर सभा होत आहे. या सभेच्या ठिकाणी ठेवलेल्या खुर्च्यांच्या मागे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे फोटो चिटकवल्याचे दिसून आले.

0
Narendra Modi
Narendra Modi

नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यवतमाळमध्ये (Yavatmal) आज मोदींची जाहीर सभा (Public Meeting) होत आहे. यवतमाळ जवळच असणाऱ्या भारी शिवारात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे. मात्र आता ही सभा वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे.  

नक्की वाचा : मराठा आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित; मनोज जरांगेंनी दिली माहिती

मोदींच्या सभेला खुर्च्यांच्या मागे राहुल गांधी यांचे फोटो (Narendra Modi)

आज (ता.२८) सकाळी या सभेच्या ठिकाणी ठेवलेल्या खुर्च्यांच्या मागे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे फोटो चिटकवल्याचे दिसून आले. या फोटोंवर एक स्कॅनर कोडही आहे. “१३८ वर्षांपासून एका चागंल्या भारताच्या निर्माणासाठी संघर्ष करत आहोत”,असा संदेश या फोटोवर छापलेला असून त्यावर देणगी मिळविण्यासाठी स्कॅनर कोडही देण्यात आला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नागपूर येथे काँग्रेसची सभा झाली होती. त्या सभेत ज्या कंत्राटदाराने खुर्च्या पुरविल्या होत्या. त्याच कंत्राटदाराला यवतमाळच्या सभेचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र कंत्राटदाराने खुर्च्यांवरील फोटो न काढताच त्या पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी पुरविल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. वृत्तवाहिन्यांनी याबाबतचे वृत्त दिल्यानंतर खुर्च्यांवरील स्टिकर हटविण्याचे काम हाती घेण्यात आले.

अवश्य वाचा : ‘समथिंग हटके’तून बाल संशोधकांचा आविष्कार  

४७ एकर परिसरात होणार पंतप्रधानांची सभा (Narendra Modi)

४७ एकर परिसरात उभारलेल्या सभामंडपात दुपारी ४ वाजता पंतप्रधानांची सभा होणार आहे. जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या जवळपास दोन लाखांवर महिला या सभेस उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे.जवळपास दोन लाख महिला या मेळाव्याला येण्याचा अंदाज आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त आज बुधवारी यवतमाळ शहरालगतच्या अनेक मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे परिक्षार्थींसह बारावीच्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here