Rahul Jagtap : श्रीगोंदा : विधानसभा मतदारसंघातील (Assembly Constituency) राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) माजी आमदार राहुल जगताप यांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या उतरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार यांनी माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) यांना पक्षातून निलंबित केले आहे. तशा प्रकारचे निलंबनाचे पत्र त्यांनी काढले आहे.
नक्की वाचा : काश्मीरमधील बनावट शस्त्र परवाना देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
महाविकास आघाडीत निर्माण झाला पेच
माजी आमदार राहुल जगताप यांनी निवडणूक प्रचारात खासदार शरद पवार यांचा फोटो सर्वत्र वापरत शरद पवार यांचे आपल्या बंडखोरीला समर्थन आहे. असा प्रचार चालविला असल्याची तक्रार महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली. या तक्रारवरुन राहुल जगताप यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे अशी माहिती समजते. महाविकास आघाडी वतीने शिवसेना (उबाठा) पक्षाच्या अनुराधा नागवडे या निवडणूक लढवत असताना राहुल जगताप हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे.
अवश्य वाचा : गृह मतदानासाठी गेलेल्या मतदान पथकाचे अनोखे स्वागत
राहुल जगताप यांच्या रुपाने आमदार देणे एवढेच ध्येय (Rahul Jagtap)
श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीची असताना ती शिवसेनेच्या उमेदवाराने बळकावली असल्याने नाराज कार्यकर्त्यांनी राहुल जगताप यांची उमेदवारी ठरवली आहे. राहुल जगताप हे शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांचे पक्षाने निलंबन केल्याचे समजले. आमचा कोणताही राग नाही आमच्या हृदयात पवार साहेबच आहेत. राष्ट्रवादी शरद पवार यांना राहुल जगताप यांच्या रुपाने एक आमदार देणे एवढेच आमचे ध्येय आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी व्यक्त केली आहे.