Rahul Solapurkar : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची आग्र्याहून सुटका (Agra)करून घेण्यासाठी मिठाईच्या पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच (Bribe) देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले,असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar)यांनी केला होता. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे.
नक्की वाचा : गुइलेन बॅरी सिंड्रोम आजार काय ? त्याची लक्षणे काय ?
राहुल सोलापूरकर यांचं वक्तव्य काय? (Rahul Solapurkar)

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नुकतीच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत राहुल सोलापूरकर म्हणाले,“पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं.छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर व त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खून व पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की थोडे रंग भरून सांगावं लागतं. मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो, असं त्यांनी म्हटलं आहे.अनेकांनी सोलापूरकर यांना समाजमाध्यमांवर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
अवश्य वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सुनबाई लय भारी’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित
राहुल सोलापूरकर नेमके कोण ? (Rahul Solapurkar)
राहुल सोलापूरकर हे ९० च्या दशकात मराठी चित्रपटांमधील खलनायकाच्या भूमिकांद्वारे घराघरात पोहोचले. ‘नशीबवान’ ‘थरथराट’,‘पळवा पळवी’,‘अफलातून’,‘सूर्योदय’,‘हम दो बंडलबाज’, ‘भिऊ निकोस मी तुझ्या पाठिशी आहे’ आणि ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ अशा अनेक चित्रपटांद्वारे प्रेक्षकांची पसंती मिळवली. महेश कोठारे दिग्दर्शित ‘थरथराट’मधील त्यांची ‘टकलू हैवान’ ही व्यक्तीरेखा विशेष गाजली.