Rahul Zaware : राहुल झावरे यांच्यावरील हल्ला प्रकरण; विजय औटीसह ११ ते १२ जणांवर गुन्हा दाखल

Rahul Zaware : राहुल झावरे यांच्यावरील हल्ला प्रकरण; विजय औटीसह ११ ते १२ जणांवर गुन्हा दाखल

0
Rahul Zaware : राहुल झावरे यांच्यावरील हल्ला प्रकरण; विजय औटीसह ११ ते १२ जणांवर गुन्हा दाखल
Rahul Zaware : राहुल झावरे यांच्यावरील हल्ला प्रकरण; विजय औटीसह ११ ते १२ जणांवर गुन्हा दाखल

Rahul Zaware : पारनेर : खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांचे समर्थक राहुल झावरे (Rahul Zaware) यांच्यावर काल (ता.६) दुपारी १२ वाजेच्या सुमारास आंबेडकर चौक, पारनेर या ठिकाणी प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती. याबाबतची फिर्याद राहुल झावरे यांनी पारनेर पोलीस (Police) ठाण्यात काल (ता.६) रात्री उशीरा दिली.

हे देखील वाचा : कंगनाच्या कानशिलात मारणाऱ्या महिलेला १ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार

वाहन अडवून मारहाण

पारनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादमध्ये नमूद करण्यात आले आहे की, पारनेर तालुक्यातील वनकुटे गावातील लोकांनी निवडणुकीच्या दिवशी यातील आरोपी विजय सदाशिव औटी यास हाकलून देऊन अपमान केल्याच्या कारणावरून आरोपी विजय सदाशिव औटी, नंदू सदाशिव औटी, प्रितेश पानमंद, मंगेश सुभाष कावरे व ११ ते १२ इसमांनी राहुल झावरे पारनेरमध्ये येत असताना त्यांचे वाहन अडवले. त्यानंतर कारचालक राजेंद्र तराळ व राहुल झावरे यांना कारच्या बाहेर ओढले. लोखंडी कोयत्याने कारची काच फोडून नुकसान केले.

Rahul Zaware : राहुल झावरे यांच्यावरील हल्ला प्रकरण; विजय औटीसह ११ ते १२ जणांवर गुन्हा दाखल
Rahul Zaware : राहुल झावरे यांच्यावरील हल्ला प्रकरण; विजय औटीसह ११ ते १२ जणांवर गुन्हा दाखल

अवश्य वाचा : विधानसभा निवडणुकीत तुतारीला पिपाणीचं टेन्शन!

रिव्हॉल्व्हर कानाला लावून जिवे मारण्याची धमकी (Rahul Zaware)

फिर्यादी राहुल झावरे यास खाली पाडून त्यांचा गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच झावरे यांच्या डोक्यात वीट मारून गजाने मारहाण केली. तसेच पाठीवर, पोटावर, छातीवर, चेहऱ्यावर काठीने मारहाण करत लोखंडी कोयत्याने मानेवर मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी विजय सदाशिव औटी याने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर झावरे यांच्या कानाला लावून जिवे मारण्याची धमकी दिली. सदरचा आरडाओरडा ऐकून फिर्यादीच्या ओळखीचे लोक सदर ठिकाणी येऊन झावरे यांना गाडीपासून बाजूला ओढले. त्यानंतर झावरे यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे फिर्यादित म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here