Rahul Zaware : राहुल झावरेंवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला गंभीर आरोप

Rahul Zaware : भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल झावरेंवर केला गंभीर आरोप

0
Rahul Zaware : भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल झावरेंवर केला गंभीर आरोप
Rahul Zaware : भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल झावरेंवर केला गंभीर आरोप

Rahul Zaware : नगर : पारनेर शहरात खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांचे समर्थक राहुल झावरे (Rahul Zaware) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या प्रकरणानंतर भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग व पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी आज सुपा (ता. पारनेर) येथे पत्रकार परिषद घेऊन राहुल झावरे यांच्यावर गंभीर आरोप केले. राहुल झावरे आणि त्यांच्या पंधरा ते वीस सहकार्यांनी घरात घुसून गर्भवती महिलेवर केलेल्या हल्ल्याची पोलीस प्रशासानाने गंभीर दखल घेवून कारवाई करावी, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली. निवडणुकीतील पराभव आम्ही स्विकारला, तुम्ही उद्रेक करून  विजयाचा आनंद घेवू नका, अशा शब्दात भाजप पदाधिकाऱ्यांनी नीलेश लंके यांच्यावर टीकास्त्र सोडले.

हे देखील वाचा : कंगनाच्या कानशिलात मारणाऱ्या महिलेला १ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार

विखे पाटील यांचे काम केल्याने कार्यकर्त्यांना धमकावले

महायुतीचे उमेदवार डाॅ सुजय विखे पाटील यांचा प्रचार केला म्हणून मागील दोन-तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या घटना घडत आहे. गुरूवारी (ता. ६) गोरेगाव (ता. पारनेर) येथे प्रितेश पानबंद यांना शोधण्यासाठी लंके समर्थक राहूल झावरे आणि त्यांचे इतर सहकारी ग्रामपंचायत कार्यालयात गेले. तिथून ते त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या पत्नी हर्षदा पानबंद व आईला जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना  मोठ्या प्रमाणात माराहाण केल्याचा आरोप भाजपचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी केला. निवडणूक संपल्यानंतर खासदारांच्या समर्थकांनी महायुतीचे उमेदवार डाॅ. सुजय विखे पाटील यांचे काम केल्याच्या कारणाने कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याच्या घटनांचे पुरावे शिंदे यांनी माध्यमांना दाखवले.

अवश्य वाचा : विधानसभा निवडणुकीत तुतारीला पिपाणीचं टेन्शन!

नगर येथे तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद (Rahul Zaware)

मारहाण झालेल्या हर्षदा पानबंद यांनी पत्रकार परिषदेत राहूल झावरे यांचे थेट नाव घेवून त्यांनी व त्याच्या समवेत आलेल्या सहकाऱ्यांनी माराहाण केली. मी गर्भवती असून पोटातही लाथा मारल्या. माझे कपडे फाडून तुझ्या नवऱ्याला आजच मारून टाकणार असल्याच्या धमक्या दिल्या. याबाबतची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात दिली. असल्याचे हर्षदा पानबंद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काल गावात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली होती. भीतीपोटी पोलीस ठाण्यात जाणे शक्य नव्हते. म्हणून आज नगर येथे तोफखाना पोलीस ठाण्यात जावून आपण फिर्याद दिली असल्याचे पानबंद यांनी सांगितले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी निवडणूक झाली आम्ही पराभव स्वीकारला आहे. मात्र, तुम्ही विजयाचा आनंद साजरा करताना त्रास देण्याची भूमिका घेवू नका. तुमच्या कार्यकर्त्यांना आवर घाला. कायम मारून टाकण्याच्या धमक्या देता तुमच्याकडे गोळ्या तरी किती आहेत, असा सवाल भालसिंग यांनी केला. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेवून या घटनेतील सहभागी व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली. भाजपच्या प्रदेश कार्यालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here