Rahuri Assembly Constituency : राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीसाठी १८९३ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणासाठी निवड

Rahuri Assembly Constituency : राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीसाठी १८९३ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणासाठी निवड

0
Rahuri Assembly Constituency : मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण;  १ हजार ८३४ अधिकारी व कर्मचारी उपस्थित
Rahuri Assembly Constituency : मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण;  १ हजार ८३४ अधिकारी व कर्मचारी उपस्थित

Rahuri Assembly Constituency : राहुरी : विधानसभा (Rahuri Assembly Constituency) पोटनिवडणूकीसाठी १ हजार ८९३ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रथम प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. मतदान अधिकारी (Polling Officers) व कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण (Training) नानासाहेब पवार सभागृह महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, सावित्रीबाई फुले हायस्कूल राहुरी येथे दोन टप्प्यात पार पडले.

नक्की वाचा : देवदैठण येथे बाप-लेक पाण्यात बुडाले; मुलाला वाचवण्यात यश तर वडिलांचा मृत्यू

Rahuri Assembly Constituency : राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीसाठी १८९३ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणासाठी निवड
Rahuri Assembly Constituency : राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीसाठी १८९३ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणासाठी निवड

५९ अधिकारी,कर्मचारी अनुपस्थित

या प्रशिक्षणास १ हजार ८९३ अधिकारी, कर्मचारी हजर होते तर ५९ अधिकारी,कर्मचारी अनुपस्थित होते. प्रशिक्षण स्थळी उपस्थितांना ईव्हीएम मशीन हाताळणीचे प्रात्यक्षिक देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी निवडणूक निरीक्षक देवानंदा रेयांग, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया, निवडणूक निर्णय अधिकारी अनुप सिंह यादव,जिल्हा नोडल अधिकारी श्रीमती गौरी सावंत ,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अमित पवार यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षणाची जबाबदारी श्रीमती संध्या दळवी, निवासी नायब तहसीलदार राहुरी यांनी पार पाडली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांनी घेतले परिश्रम (Rahuri Assembly Constituency)

प्रशिक्षण यशस्वी पार पाडण्याकरिता निवडणूक नायब तहसीलदार बडे, महसूल नायब तहसीलदार बाचकर, सर्व मंडळ अधिकारी तसेच ग्राम महसूल अधिकारी राहुरी, सर्व झोनल अधिकारी आणि मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.