
Rahuri Assembly Constituency : नगर : राहुरी विधानसभा (Rahuri Assembly Constituency) मतदारसंघ पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने मतदान अधिकारी (Polling Officers) व कर्मचारी यांचे द्वितीय प्रशिक्षण (Training) १२ व १३ एप्रिलला राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील नानासाहेब पवार सभागृह व सावित्रीबाई फुले हायस्कूल येथे झाले. या प्रशिक्षणासाठी १ हजार ८३४ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

ईव्हीएम मशीन हाताळणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक
प्रशिक्षण स्थळी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेची सैद्धांतिक माहिती देण्यासोबतच ईव्हीएम मशीन हाताळणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आले. या प्रशिक्षणास निवडणूक निरीक्षक (भा.प्र.से) देवानंदा रेयांग, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया, निवडणूक निर्णय अधिकारी अनुप सिंह यादव, जिल्हा नोडल अधिकारी गौरी सावंत व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अमित पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
नक्की वाचा : देवदैठण येथे बाप-लेक पाण्यात बुडाले; मुलाला वाचवण्यात यश तर वडिलांचा मृत्यू
यांनी विशेष परिश्रम घेतले (Rahuri Assembly Constituency)
या प्रशिक्षणाची मुख्य जबाबदारी राहुरीच्या निवासी नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी हाताळली. हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या होण्याकरिता निवडणूक नायब तहसीलदार बडे, महसूल नायब तहसीलदार बाचकर, सर्व मंडळ अधिकारी, राहुरीचे ग्राम महसूल अधिकारी, सर्व झोनल अधिकारी व मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.


