Rahuri Assembly Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

Rahuri Assembly Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

0
Rahuri Assembly Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
Rahuri Assembly Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये ; सर्व पथकांच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा

Rahuri Assembly Election : नगर : आगामी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Rahuri Assembly Election) पार्श्वभूमीवर निवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) सूचनांच्या प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी दिली.

नक्की वाचा : ढवळपुरी परिसराला गारपिटीचा तडाखा; काढणीला आलेली पिके मातीमोल, शेतकरी हवालदिल

विविध विभागांचे अधिकारी उपस्थित

जिल्हाधिकारी कार्यालयात राहूरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्च निरीक्षक व्ही. कुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.आशिया बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी शैलेश मोरे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

भरारी पथके सर्वेक्षण पथके कार्यान्वित (Rahuri Assembly Election)

निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेली सर्व भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके व नियंत्रण कक्षांनी कार्यान्वित करण्यात आले असून या सर्व पथकांनी दैनंदिन अहवाल वेळेत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

Rahuri Assembly Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
Rahuri Assembly Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

खर्च निरीक्षक व्ही. कुमार म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार नियमित निवडणूक व पोटनिवडणूक यात कोणताही भेद नसून सर्व नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. बँकांमधील संशयास्पद व्यवहारांची माहिती थेट प्राप्तिकर विभागाला कळवावी. राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने अवैध मद्य व पैशांच्या वाहतुकीवर कारवाई करावी. स्थिर सर्वेक्षण पथकांनी तपासणी नाक्यांवर चोख बंदोबस्त ठेवावा. तसेच सर्व पथकांच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करावी व त्यांच्या जागा अद्ययावत कराव्यात.

व्हिडिओ सर्वेक्षण पथकाने राजकीय सभांचे चित्रीकरण करताना मंचाचा आकार, खुर्च्यांची संख्या व इतर व्यवस्थेची सविस्तर नोंद घ्यावी जेणेकरून खर्चाचा अचूक अंदाज बांधता येईल. समाजमाध्यमांवरील प्रचारावरदेखील विशेष लक्ष ठेवावे व उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा चाळीस लाख रुपये असल्याने खर्चाच्या नोंदी अद्ययावत ठेवाव्यात. उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास ती वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

सी-व्हिजिल प्रणालीवर येणाऱ्या तक्रारींचे तातडीने निवारण करावे, असे स्पष्ट करत सर्व पथकांनी समन्वयाने काम करून पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.