Rahuri Election: वडिलांचे अधुरे स्वप्न घेऊन निघाले अक्षय कर्डिले ;जनतेच्या विकासकामांना गती देणार का?

0
Rahuri Election: वडिलांचे अधुरे स्वप्न घेऊन निघाले अक्षय कर्डिले ;जनतेच्या विकासकामांना गती देणार का?
Rahuri Election: वडिलांचे अधुरे स्वप्न घेऊन निघाले अक्षय कर्डिले ;जनतेच्या विकासकामांना गती देणार का?

नगर : राहुरी विधानसभा (Rahuri Election) मतदारसंघाने २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. मात्र, त्यानंतर काही महिन्यांतच त्यांचे निधन झालं. त्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. शिवाजीराव कर्डिले यांनी मतदारसंघासाठी पाहिलेली स्वप्न तशीच राहिली. मात्र, त्यांचे पूत्र अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्यासह पक्ष श्रेष्ठींच्या पाठबळाने कोणतेही पद नसताना मतदारसंघात विकासकामे आणली असल्याचे सांगितले जाते.

नक्की वाचा: चुकीचा नंबर डायल केल्याने ४० हजारांचा फटका; नक्की काय घडलं?

अक्षय कर्डिलेंकडून विकासकामांचा धडाका (Rahuri Election)

अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्यातून मुळा धरण पुनर्वसित गावांमध्ये पायभूत विकासासाठी २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार वावरथ, जांभळी, म्हैसगाव, शेरी चिखलठाण, बारागाव नांदूर येथे विकासकामे होणार आहेत, तसेच राज्य शासनाकडून अर्थसंकल्पीय कामांतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहेत. लवकरच हे कामही सुरू होणार आहे. अक्षय यांनी नाबार्ड योजनेंतर्गत बुऱ्हाणनगर – कापूरवाडी – आगडगाव रस्त्याच्या रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. तसेच नाबार्ड योजनेंतर्गत पाथर्डी तालुक्यातील मोहोज रस्त्यावरील कामत शिंगवे गावातील पुलासाठी ३ कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करून आणला आहे.

अवश्य वाचा: अतिवृष्टीत दगावलेल्या सर्वच पशुधनासाठी मिळणार मदत; नेमकी किती ?

तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील (Rahuri Election)

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर वडिलांप्रमाणेच अक्षय कर्डिले हे देखील बुऱ्हाणनगर येथे दररोज सकाळी ८ वाजता जनता दरबार भरवतात. तेथे नागरी समस्या सोडवतात. औद्योगिक वसाहतीत त्यांनी तरुणांना रोजगार मिळवून दिलाय आणि अनेक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यातच अक्षय हे तरुण नेतृत्व असल्याने तरुणाईमध्ये त्यांची मोठी क्रेझ दिसून येत असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. तरुणांबरोबरच शेतकऱ्यांसाठी अक्षय कर्डिले यांनी मतदारसंघातील वीज पुरवठा, नवीन ट्रान्स्फार्मर बसवून घेण्यासाठी पाठपुरावा केलाय.फुटलेली वांबोरी चारी दुरुस्त करण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केलेत.

चारी फुटल्यावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेट देऊन तेथील समस्या सोडविल्या. तसेच चारी दुरुस्त केली. अक्षय कर्डिले यांच्या पाठपुराव्यामुळे मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वावरथ व जांभळी येथे जाण्यासाठी दीडशे कोटी रुपयांच्या निधीतून पूल तयार करण्यात येणार आहे. मतदारसंघातील ७० हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे अक्षय कर्डिले यांना युवक, शेतकरी व महिला वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जाते.