Rahuri Municipal Council : राहुरी : राहुरी शहरामध्ये एकट्या राहणाऱ्या परित्यक्ता, घटस्फोटित (Divorced), विधवा किंवा प्रौढ अविवाहित यांसारख्या एकल महिलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने या महिलांची सामाजिक आर्थिक तसेच कौशल्य आधारित माहितीचे संकलन करून त्यांना आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राहुरी नगरपरिषदे (Rahuri Municipal Council) मार्फत राहुरी शहरातील सर्व एकल महिलांचे (Single Women) सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
नक्की वाचा : सामाजिक पुरस्कारांसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन (Rahuri Municipal Council)
राहुरी नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील एकल महिलांना राहुरी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात संपर्क करुन या सर्वेक्षणाचा विहित नमुन्यातील अर्ज भरून देण्यास सांगावे आणि राहुरी नगरपरिषदेच्या या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष डॉ.उषाताई प्रसादराव तनपुरे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे सर, उपाध्यक्ष गजानन सातभाई, गटनेते हर्षदादा तनपुरे,महिला बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता भारत भुजाडी आणि मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी केले आहे.



