Rahuri Municipality : राहुरी नगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर

0
Rahuri Municipality : राहुरी नगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर
Rahuri Municipality : राहुरी नगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर

Rahuri Municipality : राहुरी : राहुरी नगरपालिकेच्या (Rahuri Municipality) प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर करण्यात आला. नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर करणार आलेल्या आराखड्यावर येत्या 21 ऑगस्टपर्यंत पालिका प्रशासनकडे हरकती घेणे अपेक्षित आहे. त्यानंतर अंतिम आराखडा जाहीर होईल. प्रभारी मुख्याधिकारी वैभव लोंढे (Vaibhav Londhe) यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समितीने आज हा प्रभाग आराखडा (Ward Structure) जाहीर करण्यात आला.

नक्की वाचा : माहेरी गेलेल्या पत्नीचा परत येण्यास नकार; पतीची चार मुलांना विहीरीत ढकलून आत्महत्या

बारा प्रभागात प्रत्येकी दोन प्रमाणे 24 नगरसेवक

बारा प्रभागात प्रत्येकी दोन प्रमाणे 24 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यासाठीच्या प्रभाग आराखडा निवडणूक आयोगाच्या आलेल्या आदेशानुसार नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर करण्यात आला. द्विभाग सदस्य प्रभाग रचना असून प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. याआधी असलेली नगरसेवकांची संख्या ही तेवढीच कायम राहणार आहे.

अवश्य वाचा : लग्नाळू युवकाची फसवणूक; सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पत्नी पसार

प्रभाग निहाय माहिती याप्रमाणे- (Rahuri Municipality)

येवले आखाडा – वामन वस्ती, पिंपळाचा मळा, राहुरी कॉलेज परिसर, आघाव वस्ती , एकनाथ नगर -एकूण लोकसंख्या 3532
प्रभाग दोन – मुलनमाथा- मुलन माथा, पोपळघट इस्टेट, सुराणाइस्टेट, मुंजोबा नगर, तनपुरे खळवाडी ,दत्तनगर ,भारत नगर.
प्रभाग तीन.मेहेत्रे मळा,घाडगे इस्टेट-घाडगे वस्ती मेहेत्रे मळा, पांडुरंग नगर ,घाडगे इस्टेट, गुलदगड इस्टेट, तनपुरेवाडी रोड चा परिसर, अनमोल गणेश मंडळ परिसर ,शाहू मंगल कार्यालय परिसर ,ताराचंद पाटील वस्ती ,चौधरी वस्ती. २९५३ लोकसंख्या. प्रभाग चार -बुवासिंद बाबा- संत भैरोबा मंदिर, रेणुका माता मंदिर ,वीट भट्टी ,व्यंकटेश मंदिर ,पावन गणपती मंदिर ,भवानी माता मंदिर परिसर व बुवासिंद बाबा दर्गा

प्रभाग पाच- श्री संत सावता महाराज -आझाद चौक, जुनी स्टेट बँक,भागीरथीबाई शाळा, विद्यामंदिर शाळा परिसर तुळजाभवानी माता मंदिर सुलतान बाबा शहा बाबा दर्गा परिसर -लोकसंख्या 3479


प्रभाग सहा -शुक्लेश्वर मंदिर- उदावंत कॉम्प्लेक्स, हॉटेल अंजली परिसर ,दीपक तनपुरे कॉम्प्लेक्स परिसर जैन श्वेतांबर मंदिर ,ग्रामीण रुग्णालय परिसर, प्रगती शाळा नगरपरिषद कार्यालय व सेंट्रल बँक परिसर ,सुराणा ब्रदर्स दुकान -3074
लोकसंख्या


प्रभाग सात -गोकुळ कॉलनी- गोकुळ कॉलनी, तहसील कार्यालय परिसर, पंचायत समिती परिसर, लक्ष्मी नगर ,डावखर खळवाडी, योगा सेंटर बालाजी साडी सेंटर, हॉस्पिटल परिसर लोकसंख्या -3468, प्रभाग-8- बिरोबा नगर- बिरोबा नगर ,करपे इस्टेट, शितल थिएटर परिसर, भागीरथीबाई कॉलनी, शिक्षक बँक परिसर, सातपीर बाबा दर्गा ,गाडगे महाराज आश्रमशाळा, भालचंद्र वसाहत राहुरी खरेदी विक्री संघ बस स्थानक- लोकसंख्या 2916.


प्रभाग नऊ- जोगेश्वरी आखाडा -शाहू नगर ,काळे आखाडा , पेंडसे वस्ती, एमआयडीसी, जोगेश्वरी आखाडा, राजश्री हॉटेल परिसर, सांगळे वस्ती, साईनगर -लोकसंख्या 347


प्रभाग 10 -श्रीकृष्ण मंदिर-वराळे वस्ती, सरोदे वस्ती ,कोरडे वस्ती, श्रीकृष्ण मंदिर परिसर, बिहाणी प्लॉट , कोर्ट परिसर .लोकसंख्या 3162


प्रभाग 11- कृषी उत्पन्न बाजार समिती ,राहुरी- केशर मंगल कार्यालय,साई मंगल कार्यालय ,घाडगे इस्टेट ,नगर मनमाड रोड बीएसएनएल ऑफिस परिसर ,पोस्ट -लोकसंख्या 3031.


प्रभाग 12- राजवाडा- बालाजी मंदिर ,जामा मशीद ,मंदिर ,राजवाडा इस्टेट, बालाजी मंदिर, खंडोबा मंदिर परिसर क्रांती चौक परिसर लोकसंख्या -3485.