Raid : कर्जत : राशीन (ता.कर्जत) येथे कत्तलखान्यावर छापा (Raid) टाकून ७१० किलो गोवंश जातीचे मांस आणि कत्तलीसाठी मोकळया जागेत आणि वाहनात डांबून ठेवलेले तब्बल ५७ जनावरे कर्जत पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले. सदर घटनेतील आरोपी (Accused) फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या घटनेत एकूण १३ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
हे देखील वाचा: मुलगी दिली नाही म्हणून मौलनानेच मुलीच्या बापाचा केला खून
स्थानिक गुन्हे शाखा व कर्जत पोलिसांची कारवाई (Raid)
मंगळवारी (ता.२८) पहाटे ३ वाजता राशीन (ता.कर्जत) येथील कुरेशी मोहल्यात गोवंश जातीचे जनावरांची कत्तल होत असून याच ठिकाणी काही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवण्यात आली असल्याची माहिती मिळाली. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर आणि कर्जत पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता एक इसम घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करताना आढळून आला. गोरक्षक व पोलिसांची चाहुल लागताच तो गल्लीबोळीचा फायदा घेत पळून गेला. त्याचा पाठलाग केला. मात्र तो मिळून आला नाही. पळून गेलेल्या इसमाबाबत माहिती घेतली असता त्याचे नाव शाहबाज आयुब कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, राशिन, ता. कर्जत) असल्याचे समजले.
नक्की वाचा : ‘चित्रपटानंतर गांधींना ओळख मिळाली त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं’- मोदी
तब्बल ५७ जीवंत जनावरे ताब्यात (Raid)
सदर इसमाचे घरासमोरील शेडची तसेच घराच्या आजुबाजुची ठिकाणाची व कुरेशी मोहल्याची पाहणी केली असता तेथे कत्तल केलेल्या जनावरांचे ७१० किलो मांस व गोवंशीय जातीचे लहान-मोठे तब्बल ५७ जीवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने मोकळ्या जागेत, काटवनात यासह उभे असलेल्या दोन पिकअप वाहनात मिळुन आले. सदरची जनावरांबाबत अधिक माहिती घेतली असता ते सोहेल कुरेशी व सुलतान कुरेशी (पुर्णनाव माहित नाही) यांची असल्याचे समजले. वरील तिघांवर ऋषिकेश नंदकुमार भागवत यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.