Raid : रुईछत्तीसी येथे कुंटणखाण्यावर छापा ; ११ महिलांची सुटका

Raid : रुईछत्तीसी येथे कुंटणखाण्यावर छापा ; ११ महिलांची सुटका

0
Raid : रुईछत्तीसी येथे कुंटणखाण्यावर छापा ; ११ महिलांची सुटका
Raid : रुईछत्तीसी येथे कुंटणखाण्यावर छापा ; ११ महिलांची सुटका

Raid : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने छापा टाकून (Raid) ११ महिलांची सुटका केली आहे. याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस (Police) ठाण्यात चार जणांविरुध्द्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : भरदिवसा ट्रक चालकाचा गळा कापला; दोघे आरोपी जेरबंद

लॉजिंगमध्ये महिलांकडून कुंटणखाना चालवत

गणेश संपत गोरे (रा.रूईछत्तीसी), मनोज आसाराम गावडे (रा.धानोरा, ता.आष्टी, जि.बीड), शुभम अशोक पाळंदे (वय २९, रा.मुलनमाथा, ता.राहुरी), राणा (पूर्ण नाव माहित नाही), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार रुईछत्तीसी येथील एका लॉजिंगमध्ये स्वतः च्या फायद्यासाठी महिलांकडून कुंटणखाना चालवत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून ११ महिलांची सुटका केली.

नक्की वाचा : भारताला मोठा धक्का!जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर

तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Raid)

याबाबत पोलीस भाग्यश्री गंगाधर भिटे यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे तुषार धाकराव, पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, अतुल लोटके, गणेश लोढे, संतोष खैरे, सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे, रोहित येमुल, भाग्यश्री भिटे व उमाकांत गावडे यांच्या पथकाने केली.