Raid : अनधिकृत खतांच्या साठ्यावर कृषी विभागाचा छापा

Raid : अनधिकृत खतांच्या साठ्यावर कृषी विभागाचा छापा

0
Raid : अनधिकृत खतांच्या साठ्यावर कृषी विभागाचा छापा
Raid : अनधिकृत खतांच्या साठ्यावर कृषी विभागाचा छापा

Raid : नगर : कृषी विभागाच्या (Agriculture Department) जिल्हास्तरीय भरारी पथकाने (Squad) अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथील कृषी सेवा केंद्रावर छापा (Raid) टाकून अनधिकृत खतांचा साठा आढळून आला आहे. तसेच तपासणी दरम्यान ई-पॉस प्रणालीत फेरबदल करून शासनाची (Government) फसवणूक (Fraud) केल्याचे उघड झाले आहे. याबाबत दोघा जणांवर गुन्हा दाखल (Crime filed) करण्यात आला आहे.

नक्की वाचा : बापरे! कोल्हापूरातील धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या

अवैध खतांचा साठा असल्याची मिळाली होती माहिती

दत्तात्रय गोपीनाथ शेळके असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांना मिळालेल्या माहितीनुसार धामणगाव परिसरात अवैध खतांचा साठा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल ढगे, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी आणि कृषी अधिकारी रत्नमाला शिंदे यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार कृषी सेवा केंद्रावर छापा टाकला.

अवश्य वाचा : निराधार बालकांना आधार कार्ड मिळणार

ई-पॉस प्रणालीत फेरबदल करून शासनाची फसवणूक (Agriculture Department)

ई-पॉस प्रणालीत १.९३५ मे. टन (४३ गोणी) साठा शिल्लक असल्याचे दिसून आले. मात्र, त्या खताच्या गोण्या गोदामात नसल्याचे आढळून आले. अधिक चौकशी केली असता ई-पॉस प्रणालीत फेरबदल करून प्रत्यक्ष विक्री न करता साठा कमी केल्याचे आढळून आले. त्यामुळे शासनाची फसवणूक झाल्याचे उघड झाले. भरारी पथकाने शेजारील घराची पाहणी केली असता तिथे अनधिकृत ३४.२४५ मे. टन (७६१ गोणी) खताचा साठा आढळून आल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.