Raigad News:रायगड किल्ल्याची पायरी वाट बंद, प्रशासनाचा मोठा निर्णय

0
Raigad News : रायगड किल्ल्याची पायरी वाट बंद, प्रशासनाचा मोठा निर्णय
Raigad News : रायगड किल्ल्याची पायरी वाट बंद, प्रशासनाचा मोठा निर्णय

Raigad News : राज्यभरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे पावसाळ्यात गड-किल्ल्यांच्या पर्यटनाला (Fort Tourism) सगळेच अधिक महत्व देतात. मात्र पावसाळ्यात रायगड किल्ल्याला (Raigad Fort) भेट देण्याचा विचार करत असाल तर थोडंसं थांबा. कारण मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील प्रशासन सतर्क झालं आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किल्ले रायगडावर जाणाऱ्या पारंपरिक पायरी मार्गावर (Stepping Stone) तातडीने बंदी (Ban) घालण्यात आली आहे. पूर्ण पावसाळा ऋतू संपेपर्यंत हा पायरी मार्ग बंदच ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

नक्की वाचा : मोठी बातमी!आमदार,खासदारांसाठी म्हाडाचे घर अवघ्या साडेनऊ लाखात!  

पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका (Raigad News)

रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांच्या मार्गावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या मार्गावर पावसाचे पाणी वेगानं वाहत असल्यामुळे पर्यटकांना धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने वेळेत निर्णय घेत, कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून पायरी मार्ग पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.

अवश्य वाचा : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर फेकली अंडी;भारतीयांचा संताप  

पर्यटकांनी सहकार्य करण्याची प्रशासनाची विनंती (Raigad News)

रायगडावरील पायरी मार्ग बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात आली असून, पर्यटकांनी प्रशासनाशी सहकार्य करावं,असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पर्यायी मार्गाने किल्ल्यावर जाण्याबाबत अजून कोणतीही अधिकृत सूचना दिली गेलेली नाही. त्यामुळे पर्यटकांनी काही दिवसांचा संयम बाळगावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असंही सांगण्यात आलं आहे. हा निर्णय जिल्हाधिकारी किशन जावळे आणि रायगडचे पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

जिल्हा प्रशासनाकडून पावसाळ्याच्या कालावधीत किल्ल्याच्या इतर मार्गांबाबतही नियमितपणे निरीक्षण ठेवण्यात येत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला असल्यामुळे, रायगड परिसरात कोणताही अपघात घडू नये, यासाठी ही काळजी घेतली जात आहे.