Railway : नगर-बीड रेल्वेमार्गाच्या कामाला गती येणार; १०० कोटीचा निधी वितरित

Railway : नगर-बीड रेल्वेमार्गाच्या कामाला गती येणार; १०० कोटीचा निधी वितरित

0
Railway : नगर-बीड रेल्वेमार्गाच्या कामाला गती येणार; १०० कोटीचा निधी वितरित
Railway : नगर-बीड रेल्वेमार्गाच्या कामाला गती येणार; १०० कोटीचा निधी वितरित

Railway : नगर : ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या महत्त्वाकांक्षी ब्रॉड गेज रेल्वेमार्ग (Railway Route) प्रकल्पाला राज्य सरकारने (State Government) आणखी वेग देत १०० कोटी रुपयांचा निधी (Funds) काल (ता. ०२) वितरित केला आहे. या निधीच्या वितरणामुळे या प्रकल्पाच्या कामाला अधिक गती येणार आहे.

हे वाचा : परदेशात अडकलेल्या नागरिकांशी प्रशासनाकडून संपर्क – विखे पाटील

एकूण खर्च

ग्रामीण भागातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाकडून ४० ते ५० टक्के आर्थिक सहभाग देण्यात येतो. त्यानुसार अहिल्यानगर-बीड-परळी या २६१ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाला ५० टक्के आर्थिक सहभाग देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. या प्रकल्पासाठी ४,८०५.१७ कोटी रुपये अंदाजित खर्च लागणार आहे. त्यानुसार प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के म्हणजे २,४०२.५९ कोटी रुपये राज्य शासनाचा सहभाग राहणार आहे.

हे पहा : वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखेची कारवाई

उर्वरित रक्कमेस मंजुरी (Railway)

मराठावाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्य शासनाने सप्टेंबर २०२५ मध्ये २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता राज्य हिस्सा म्हणून १५० कोटी रुपये वितरित केले होते. आता यातील उर्वरित रक्कम म्हणून १०० कोटी रुपये इतकी रक्कम वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या २६१ किलोमीटर लांबीच्या ब्रॉड गेज रेल्वे मार्ग प्रकल्पाकरिता आतापर्यंत राज्य शासनाने २,२४१.२३ कोटी इतका निधी वितरित केला आहे. या प्रकल्पासाठी ४,८०५.१७ कोटी रुपये अंदाजित खर्च लागणार आहे.