Railway Police : रेल्वेमधून डिझेल चोरणारी टोळी जेरबंद; रेल्वे पोलिसांची कारवाई

Railway Police : रेल्वेमधून डिझेल चोरणारी टोळी जेरबंद; रेल्वे पोलिसांची कारवाई

0
Railway Police : रेल्वेमधून डिझेल चोरणारी टोळी जेरबंद; रेल्वे पोलिसांची कारवाई
Railway Police : रेल्वेमधून डिझेल चोरणारी टोळी जेरबंद; रेल्वे पोलिसांची कारवाई

Railway Police : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा कासार रेल्वे स्टेशन तसेच अकोळनेर येथील ऑईल डेपो (Akolner Oil Depot) परिसरातून रात्रीच्या वेळी रेल्वे ट्रॅकवरील उभ्या असलेल्या मालगाडीच्या टँकर मधून पेट्रोल – डिझेल चोरी (Petrol – Diesel Theft) करणारी ६ जणांची टोळी रेल्वे पोलिसांच्या (Railway Police) क्राईम ब्रँच (सीआयबी) दौंड, पुणे या पथकाने ताब्यात घेतली आहे.

अवश्य वाचा : अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद; वनविभागाची कारवाई

ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे

दत्तात्रय शिवाजी लिंभोरे, त्याचा भाऊ प्रमोद शिवाजी लिंभोरे, शुभम गुलाब धामणे, अक्षय आप्पासाहेब ढोरजकर, अक्षय बापूराव कडूस, वैभव राजेंद्र धामणे असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

नक्की वाचा : कारमधून तब्बल एक कोटीची रोकड जप्त; संगमनेरमध्ये मोठी कारवाई

मालगाडीच्या टँकर मधून वारंवार पेट्रोल-डिझेल चोरीच्या घटना (Railway Police)

सारोळा कासार रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे ट्रॅकवरील उभ्या असलेल्या मालगाडीच्या टँकर मधून पेट्रोल-डिझेल चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या, मात्र रेल्वे पोलिसांना या चोरट्यांचा तपास लागत नव्हता १३ व १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पुन्हा डिझेल चोरी झाली. ही माहिती मिळताच रेल्वे क्राईम ब्रँच (सीआयबी) दौंड, पुणे चे पोलीस निरीक्षक बी.डी. इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गाढवे, एकनाथ गडदे, आण्णासाहेब पाखरे, रामनाथ केकाण, धनंजय यादव, नगर आरपीएफ युनिट चे दीपक कर्डिले, विठ्ठल खंडागळे यांच्या पथकाने केली.