Train Ticket Reservation:रेल्वेची तिकीट बूक प्रणाली सुलभ होणार,चार महिन्यांचा नियम रद्द

0
Train Ticket Reservation:रेल्वेची तिकीट बूक प्रणाली सुलभ होणार,चार महिन्यांचा नियम रद्द
Train Ticket Reservation:रेल्वेची तिकीट बूक प्रणाली सुलभ होणार,चार महिन्यांचा नियम रद्द

Train ticket Reservation : रेल्वे प्रवास (Train Travel) हा नागरिकांच्या खिशाला परडणारा असतो. त्यामुळे भारतात रेल्वे प्रवाशांची संख्या अफाट आहे. हे प्रवासी तिकीट बूक (Ticket Book) करण्यासाठीची ऑनलाइन विंडो ओपन होण्याची आतुरतेने वाट बघत असतात. भारतीय रेल्वेमध्ये १२० दिवस आधी तिकीट बूक करण्याचा नियम आहे. मात्र हा नियम आता बदलण्यात आला आहे. आता तुम्ही केवळ ६० दिवस आधी रेल्वेचं तिकीट आरक्षित (Reservation) करू शकतात.

नक्की वाचा :  उज्जैनच्या निकिता पोरवालने पटकावला ‘मिस इंडिया’चा किताब  

तिकीट आरक्षित करण्याची मुदत १२० दिवसांवरून ६० दिवस (Train Ticket Reservation)

रेल्वे मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना आज (ता.१७) जारी केली आहे. त्यानुसार आता आगाऊ आरक्षणाची मुदत कमी करण्यात आली आहे. तिकीट आरक्षित करण्यासाठीची मुदत १२० दिवसांवरून ६० दिवस करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेने एआरपी म्हणजेच अ‍ॅडव्हान्स्ड रिझर्व्हेशन पीरियड दोन महिन्यांनी कमी केला आहे. रेल्वेचा नवीन नियम येत्या १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. हा नवा नियम भारतीय नागरिकांसह परदेशी प्रवाशांनाही लागू होणार आहे. याचाच अर्थ भारतातील पर्यटकही ६० दिवस आधी तिकीट आरक्षित करू शकतील. यासह ज्या रेल्वे गाड्यांचा ए आर पी आधीच कमी आहे. त्यावर नव्या नियमाचा कोणताही परिणाम होणार नाही. यामध्ये गोमती एक्सप्रेस व ताज एक्सप्रेससारख्या गाड्यांचा समावेश आहे.

अवश्य वाचा :  ‘मुख्यमंत्री व्हायचं असेल तर खूप उठा-बशा’-जयंत पाटील  

रेल्वेने नियम का बदलला ?(Train Ticket Reservation)

लोकांना रेल्वेचा अधिकाधिक वापर करण्यास प्रोत्साहन मिळावं, त्यांच्या प्रवासाचं नियोजन सोपं व्हावं, प्रवास सुलभ व्हावा, तिकीट रद्द करण्याचं प्रमाण कमी व्हावं यांसारख्या अनेक कारणांमुळे या नियमांत बदल करण्यात आला आहे. तसेच तिकीट आरक्षणाचा कालावधी कमी करण्यात यावा,अशी मागणी सातत्याने प्रवासी संघटनांकडून व सामान्य प्रवाशांकडून होत होती. त्या मागणीचा विचार करून रेल्वेने आपल्या नियमामध्ये बदल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here