काेड रेड
Rain : नगर : नगर जिल्ह्यात पुढील तीन तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस (Rain) बरसणार आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिला आहे. त्यामुळे विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, तसेच घराबाहेर पडताना खबरदारी (Caution) घ्यावी, असे हवामान विभागाकडून सतर्क करण्यात आले आहे.
नक्की वाचा: दरोड्याचा प्लॅन फसला; तिघे जेरबंद
जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज पुन्हा विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस हाेणार आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडणे व जाेरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
हे देखील वाचा: कन्हैया कुमार यांच्यावर दिल्लीत हल्ला; हार घालण्याच्या बहाण्याने कानशिलात लगावली
विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा (Rain)
विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार नगर, पुणे, बीड, धाराशिव येथे पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.